esakal | राष्ट्रवादीचे नेतेही सत्तास्थापनेसाठी राजभवनला येणार?
sakal

बोलून बातमी शोधा

NCP leaders may also comes to RajBhavan for power With Shivsena

शिवसेनेच्या नेत्यांसबोबत राष्ट्रवादी काँग्रसे पक्षाचे नेतेही सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राजभवनाला येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा संघर्ष चालू असताना आज (ता.11) सत्तास्थापनेचा हा संघर्ष संपेल असे वाटत आहे. शिवसेना हा सत्तास्थापनेचा दावा करणार आहे.

राष्ट्रवादीचे नेतेही सत्तास्थापनेसाठी राजभवनला येणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेनेच्या नेत्यांसबोबत राष्ट्रवादी काँग्रसे पक्षाचे नेतेही सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राजभवनाला येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा संघर्ष चालू असताना आज (ता.11) सत्तास्थापनेचा हा संघर्ष संपेल असे वाटत आहे. शिवसेना हा सत्तास्थापनेचा दावा करणार आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

भारतीय जनता पक्षाकडून सत्ता स्थापन करणार नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर दुसरा महत्वाचा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांकडून शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. आज सायंकाळी साडेसातपर्यंत त्यांना मुदत दिलेली असतानाच शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी शिवसेनेसोबत जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री?

दरम्यान, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, काँग्रेस नेते के.सी.पाडवी, विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार या नेत्यांशी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या चर्चा करत असून त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्या आपला निर्णय जाहीर करणार आहेत.