Sharad Pawar Birthday : जेव्हा पवारांच्या डोळ्यात सुशीलकुमार शिंदेंसाठी अश्रू उभे राहिले..

शरद पवारांच्या सांगण्यावरून सुशीलकुमार शिंदे यांनी पोलिस खात्याची नोकरी सोडली होती
Sharad Pawar Birthday
Sharad Pawar Birthdayesakal

Sharad Pawar Birthday : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यातील मैत्रीचे बरेच किस्से जगजाहीर आहेत. त्यांची मैत्री राजकारणापलीकडची असल्याचं नेहमीच बोललं जातं. आणि या नेत्यांनी वेळोवेळी याचे दाखले सुद्धा दिलेत. पुण्यात एका कार्यक्रमावेळी त्यांनी सुशील कुमार शिंदेच्या मैत्रीचा हा किस्सा सांगितला होता. तर सुशील कुमार शिंदे हे पोलिस उपनिरीक्षक बनले होते. मुंबईत सीआयडी ऑफिसर म्हणून काम करत होते.

Sharad Pawar Birthday
Sharad Pawar Birthday : या निवडणुकीत शरद पवारांनाही करावा लागला पराभवाचा सामना!

याच काळात शरद पवार आणि शिंदे यांच्यात मैत्री वाढली. दोघे तसे समवयस्क. सुशीलकुमार शिंदेंनीही पवारांना विद्यार्थीदशेपासून पाहिलं होतं. शरद पवार हे जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे मानस पुत्र मानले जायचे. त्यांच्या आग्रहामुळे सुशीलकुमार शिंदे नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात आले. यशवंतराव चव्हाण यांना त्यांनी आपला नेता मानलं होतं.

Sharad Pawar Birthday
Sharad Pawar News : शरद पवारांनी कर्नाटकप्रश्नी मार खाल्ल्याचे पुरावे द्या!; निलेश राणेंची मागणी

१९७२ साली पवारांच्या आग्रहामुळे सुशील कुमार शिंदेंना करमाळ्यातून आमदारकीचं तिकीट मिळालं. पण पुढे काही कारणास्तव शिंदेंचं नाव वगळून तायाप्पा सोनवणे यांना आमदारकीचं तिकीट मिळालं. इकडे सुशीलकुमार शिंदे मात्र द्विधा मनस्थितीत सापडले. कारण त्यांनी चांगल्या पगाराची सीआयडीची नोकरी या राजकारणापायी सोडली होती. आता तर आमदारकीचं तिकीट पण गेलं.

Sharad Pawar Birthday
Sharad Pawar: ...तरीही शरद पवार कर्नाटकात घुसलेच; कर्नाटक सरकारची तेव्हा भंबेरी उडाली होती

शरद पवारांच्या सांगण्यावरून सुशीलकुमार शिंदे यांनी पोलिस खात्याची नोकरी सोडली होती. पोटनिवडणुकीत आमदारकीचं तिकीट मिळेल, असं आश्वासन पवारांनी त्यांना दिलं होतं. पण त्यांना तिकीट मिळालं नाही, म्हणून शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू तरळले. हा किस्सा स्वतः शरद पवारांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात सांगितला होता.

Sharad Pawar Birthday
Palak Paneer Recipe : या पाच सोप्या स्टेप्सने बनवा हॉटेल स्टाइल पालक पनीर रेसिपी!

पवारांनी पुढे सांगितलं की, "मी त्या सरकारमध्ये गृहमंत्री झालो होतो. शिंदे हे कायद्याचे पदवीधर असल्याने मी त्यांना सरकारी वकील केलं. आमच्याकडे जी काही प्रकरणे आली, ती आम्ही शिंदे यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला.

Sharad Pawar Birthday
Cucumber Thalipeeth Recipe : बनवा खूशखुशीत,खमंग अन् हेल्दी काकडीचे थालीपीठ

पण नंतर तायाप्पा सोनवणे यांच्या निधनानंतर रिकाम्या झालेल्या आमदारकीच्या जागेवर पोटनिवडणूक लागली. आणि सुशीलकुमार शिंदे यांना त्या जागेवरून तिकीट मिळालं. एवढंच नाही तर खुद्द मुख्यमंत्री वसंतराव नाईक त्यांच्या प्रचारासाठी करमाळ्याला आले. या तरुणाला निवडून द्या मी त्याला मंत्री करतो असं आश्वासनही करमाळ्याच्या जनतेला दिलं. आणि सुशीलकुमार शिंदे पहिल्याच फटक्यात मंत्री झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com