Sharad Pawar Birthday : या निवडणुकीत शरद पवारांनाही करावा लागला पराभवाचा सामना!

श्रीनिवास पाटील या मित्रासाठी शरद पवार यांनी भरपावसात भाषण केले आणि अनेकांच्या पापण्या भर पावसातही पाणावल्या होत्या
Sharad Pawar
Sharad PawarEsakal

अनेक वर्ष राजकारणात यशस्वीपणे राहून ज्या वयात लोक राजकीय सन्यास घेऊन नातवंडासोबत जीवन व्यतीत करायचा विचार करतात. अशा 82 व्या वयात देखील एक ‘योद्धा’ लढयला सज्ज असतो. अगदी काल परवापर्यंत नाशिक मधील शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावर आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. प्रचंड ऊर्जा अन् आशावाद हा त्यांच्यात ठासून भरला आहे त्या लढवय्या नेत्याचे नाव आहे शरद पवार.

'राष्ट्रवादी कॉंग्रेस'चे अध्यक्ष शरद पवार वयाची 82 वर्षं पूर्ण करत आहेत. त्यापैकी 5 दशकांहून अधिक काळ ते राजकारणात कार्यरत आहेत. या काळात महाराष्ट्राचं राजकारण त्यांच्याभोवती फिरत आलं आहे.

दांडगा राजकीय अनुभव असलेल्या शरद पवार यांचा राजकीय आणि सार्वजनिक प्रवेश तसा वयाच्या तिसऱ्याच दिवशी झाला होता. याबद्दल ते स्वत:च ‘लोक माझा सांगाती’ मध्ये म्हणतात की, एकंदरीतच आमच्या कुटुंबातील वातावरण माझ्या राजकीय-सामाजिक जडणघडणीचा पाया होता. विनोदाने सांगायचं तर, माझा सार्वजनिक जीवनातील प्रवेश वयाच्या तिसऱ्या दिवशी झाला. माझी आई मला तिसऱ्या दिवशी कडेवर घेऊन लोकल बोर्डाच्या बैठकीला उपस्थित होती.

Sharad Pawar
Gopinath Munde Anniversary: कागदावरची आकडेमोड कधी मैत्रीच्या आड आली नाही, किस्सा युतीचा

२०१४ मध्ये भाजप सरकारने सोशल मिडीयाचा आधार घेत प्रचार केला. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीनेही सोशल मिडीयावर भर दिला. पण, त्यातही अधिक प्रभावीपणे शरद पवारच दिसून आले. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी श्रीनिवास पाटील या मित्रासाठी शरद पवार यांनी भरपावसात भाषण केले आणि अनेकांच्या पापण्या भर पावसातही पाणावल्या होत्या.

शरद पवार राजकारणात मुरलेले नेते. आजवर अनेक राजकीय मैदाने गाजवलेल्या शरद पवारांनाही पराभवाचा सामना करावा लागला होता.  शरद पवारांना देखील निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याबद्दलच आज जाणून घेऊयात.

Sharad Pawar
LIVE Update: शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ

शरद पवारांनी निवडणूक स्वत: लढवली की कधीही पराभूत होत नाहीत. किंवा जेव्हा विजयाची खात्री नसते तेव्हा ते लढत नाहीत. पण तरीही त्यांना एका निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. तो त्यांच्या आजवरच्या निवडणुकांच्या कारकीर्दीतला एकमेव पराभव होता. तो पराभव राजकारणाच्या नाहीतर भलत्याच मैदानातील होता.

2004 मध्ये जगमोहन दालमिया यांच्याकडून अत्यंत अटीतटीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला. कशाची होती ही निवडणूक आणि कोण होते शरद पवार यांचा पराभव करणारे जगमोहन दालमिया याबद्दल जाणून घेऊयात.

2004 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजे 'बीसीसीआय'च्या निवडणुकीत तत्कालिन अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी त्यांचा पराभव केला होता. 2001 मध्ये त्यांनी 'मुंबई क्रिकेट असोसिएशन'च्या निवडणुकीत अजित वाडेकर यांचा पराभव केला होता. ते भारतीत क्रिकेट व्यववस्थापनातला त्यांचा प्रभाव वेगाने वाढत गेला.

2004 च्या पराभवाने त्यांना धक्का दिला. पण त्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांनी दालमियांचा पराभव केला आणि ते 'बीसीसीआय'चे अध्यक्ष बनले. त्यानंतर पवार आणि त्यांच्या गटाचा भारतीय क्रिकेटवर बरीच वर्षं अंकुश राहिला. भारतीय क्रिकेटच्या व्यावसायिक स्वरूपात बदल होणं सुरु झालं होतं. पवार आल्यानंतर तो वेग अधिक वाढला.

Sharad Pawar
Monday Special: सोमवारी महादेवाची भक्तांवर असते विशेष कृपा; त्यासाठी करा हे एक काम...

2010 मध्ये ते 'आंतराष्ट्रीय क्रिकेट मंडळा'चे म्हणजे 'आयसीसी'चे अध्यक्ष बनले. 'टी-20'ची 'इंडियन प्रीमीयर लिग' ही त्यांच्या काळात सुरु झाली आणि क्रिकेटचे रुप पालटलं. अर्थात 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं लोढा समितीच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर पवारांची स्वत:ची क्रिकेट व्यवस्थापनातली इनिंग संपुष्टात आली.

ही निवडणूक जशी बीसीसीआयच्या इतिहासातील सर्वात नाट्यमय निवडणूक म्हणून लक्षात ठेवली जाते, तशीच ती पवारांना सार्वजनिक आयुष्यातील पराभव बघायला लावणारी निवडणूक म्हणून देखील लक्षात ठेवली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com