

Jayant Patil disclosed key details of meetings held for NCP unity
esakal
Jayant Patil explains NCP merger meetings : राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत दिवंगत नेते अजित पवार आग्रही होते, असा महत्त्वपूर्ण खुलासा पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केला. अजित पवार आणि माझ्यात अलिकडच्या काळात अनेकदा सकारात्मक चर्चा झाली होती. जवळपास आठ ते दहा वेळा आमच्या भेटी झाल्या असून, “साहेबांच्या डोळ्यादेखतच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पाहायच्या आहेत,” असे अजित दादा वारंवार सांगत होते, असे जयंत पाटील यांनी भावूक होत सांगितले.