NCP MLA disqualification Case: राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलं नवीन वेळापत्रक, निकाल कधी?

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणात सुनावणी संपली आहे. पुढील सुनावणी २३ जानेवारीला सकाळी ११ वाजता होणार आहे. आज अर्धा तास सुनावणी घेण्यात आली.
NCP MLA disqualification Case
NCP MLA disqualification Case

NCP MLA disqualification Case

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणात सुनावणी संपली आहे. पुढील सुनावणी २३ जानेवारीला सकाळी ११ वाजता होणार आहे. आज अर्धा तास सुनावणी घेण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे.

२३,२४ जानेवारीला उर्वरित ४ जणांची उलट तपासणी होणार आहे. २५ तारखेला अन्य दोन साक्षीदारांची उलट साक्ष नोंदवली जाणार आहे. २९ जानेवारीला दोन्ही गटांचे लेखी सबमिशन दिले जाणार. ३० तारखेला अंतिम युक्तिवाद होणार असून ३१ जानेवारीला सुनावणी पूर्ण करायची आहे. त्यापुढे ८ ते १० दिवस अंतिम निकाल जाहीर करणार, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

आजच्या सुनावणीत काय घडलं?

अनिल पाटील यांच्या विरोधात आमच्याकडे काही नवीन कागदपत्रे आहेत, ते आम्ही सुनावणी दरम्यान सादर करु अशी माहिती शरद पवार गटाने विधानसभा अध्यक्षांना दिली. दोन्ही गटांच्या बाजून योग्य पद्धतीने मांडायच्या असतील तर आपल्याला वेळापत्रकात बदल करावा लागेल, असे अध्यक्षांनी म्हटले होते. त्यानुसार नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

NCP MLA disqualification Case
Manoj Jarange : जरांगेंच्या आंदोलनामुळे सरकारमधील मंत्री नाराज, तणाव वाढला? शंभूराज देसाई दिलं स्पष्टीकरण

जयंत पाटील म्हणाले, अजित पवार यांच्या गटाने वेळ वाढवून मागितला आहे. वकिलांनी त्याला विरोध केला होता मात्र विधानसभा अध्यक्षांनी त्याचा निर्णय घेतला आणि २३ तारखेला मुख्य सुनावणी ठेवली आहे. आज माझी साक्ष झाली नाही.

शरद पवार भाकरी फिरवण्याचा उल्लेख करत होते. या अर्थ पक्षात नाराजी होती, असे अनिल पाटील म्हणाले होते. यावर जयंत पाटील म्हणाले, अनिल पाटील २०१८ ला आमच्या पक्षात आले आहेत. त्यामुळे भाकरी फिरवण्याचा आणि त्यांचा काही संबंध नाही. कारण पक्ष कसा चालतो हे त्यांना माहित नाही. त्यांना भाजपने तिकीट नाकारलं त्यानंतर ते पक्षात आले. 

NCP MLA disqualification Case
Shoaib Malik : अल्लाहची इच्छा! शोएब मलिक अडकला पुन्हा लग्नाच्या बंधनात! Insta पोस्ट मुळे सानियासोबत घटस्फोटाच्या अफवांना उधाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com