आपल्याला पवारसाहेबांना साथ द्यायची आहे : जितेंद्र आव्हाड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातील जातीयवादी पक्षांना रोखण्याची जबाबदारी शरद पवार यांनी 60 वर्षांपूर्वी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. शरद पवारांची भूमिका स्पष्ट आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही.

मुंबई : भाजपला साथ नाही ही राष्ट्रवादीची भूमिका नाही. कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना आवर घालावा. आपल्याला पवारसाहेबांच्या साथ द्यायची आहेत. आपण पवारांसोबत ताकदीने राहायचे आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राजभवनात आज (शनिवार) सकाळी आठ वाजता राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पार्थ पवार, सुनेत्रा पवार राजभवनात उपस्थित होत्या. मात्र, शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवारांच्या पाठिशी नसल्याचे स्पष्ट केले आहे. याविषयी जितेंद्र आव्हाड यांनीही व्हिडिओ ट्विट करून स्पष्ट केले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस फुटली; अजित पवारांचे बंड 

आव्हाड म्हणाले, की महाराष्ट्रातील जातीयवादी पक्षांना रोखण्याची जबाबदारी शरद पवार यांनी 60 वर्षांपूर्वी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. शरद पवारांची भूमिका स्पष्ट आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही. फुले-शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांचे आहोत, ते या विचारांशी बांधील आहेत. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्याने भावनाविवश होऊ नये. पवारसाहेब आपल्यासोबत आम्ही आहोत. 

अजित पवारांनी आमच्यासोबत यायचा निर्णय घेतला : फडणवीस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLA Jitendra Awhad talked about Ajit Pawar with BJP