राष्ट्रवादीच्या नेत्याने सुचवलेला 'हा' पर्याय भाजप-शिवसेना निवडणार?

टीम ई-सकाळ
Friday, 1 November 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 50-50 च्या सूत्रावर बातचीत झाली नसल्याचं म्हणतायत. तर शिवसेनेकडून सत्तेत समसमान वाट्याचा पुनरुच्चार केला जातोय.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला असला, तरी राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी प्रचंड राजकीय उलथापालथ सुरू आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही युती पक्षांत राजकीय हालचाली वेगाने वाढल्या आहेत. मुख्यमंत्री आमचाच असा विश्वास दोन्ही पक्षांनी व्यक्त केला असल्यामुळे राज्यात सत्तास्थापन करण्यास उशीर होत आहे.

निवडणुकीआधी 'आमचं ठरलंय' असं दाखवणाऱ्या या दोन्ही मित्रपक्षांवर विरोधी पक्षांनी तोंडसुख घेण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी उपाय सुचवत दोन्ही पक्षांना चिमटा काढला आहे.  

- नेटकऱ्यांनी काढले अमृता फडणवीसांच्या मराठीचे वाभाडे!

''युतीने आता सरळ रामाच्या पादुका आणून मुख्यमंत्र्याच्या सिंहासनावर ठेवाव्या आणि राज्य कारभार करावा, नाहीतरी रामराज्यच आणायचे आहे.'' अशा आशयाची पोस्ट आव्हाड यांनी ट्विटरवर केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात महायुतीचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला. भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह 13 खात्यांचे मंत्रिपद देण्याचे घोषित केले. मात्र, मुख्यमंत्रिपदासह गृह, अर्थ, महसूल आणि नगरविकास ही खाती आमच्याकडेच राहतील, असे स्पष्टीकरण दिल्यामुळे सत्ता स्थापनेला उशीर होत चालला आहे. 

- आघाडीच्या रणनीतीचे सर्वाधिकार पवारांकडे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 50-50 च्या सूत्रावर बातचीत झाली नसल्याचं म्हणतायत. तर शिवसेनेकडून सत्तेत समसमान वाट्याचा पुनरुच्चार केला जातोय. 'गरज पडली तर आम्ह बहुमत आणून दाखवू आणि सरकार स्थापन करून दाखवू,' असा दावा सेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 2014 पासून सत्ता उपभोगणाऱ्या या युती पक्षांना आव्हाडांनी चांगलाच टोला लगावला आहे.

- सेनेच्या हातात घड्याळ? भाजपला शह देण्यासाठी हालचाली वेगात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLA Jitendra Awhad twitted about Shivsena and BJP