पवार-मोदी यांच्यातील भेटीचा राजकीय अर्थ चुकीचा : मलिक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती सांगण्यासाठी पंतप्रधान यांची भेट शरद पवार घेत आहेत. आज काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक होईल त्यांनतर पुढे कसे जायचे ठरवले जाईल. किमान समान कार्यक्रमावर आज बैठकीत चर्चा केली जाईल, तो अजेंडा पक्ष नेतृत्वाला दिला जाईल.

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असून, यांच्यातील भेटीचा राजकीय अर्थ चुकीचा आहे, असे राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

मोदी आणि पवार यांची आज दुपारी साडेबारा वाजता लोकसभेत भेट होणार आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये मंगळवारीच भेट होणार होती. पण, ती होऊ न शकल्याने आज ही भेट होणार आहे. पवार यांनी अद्याप राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहण्यात येत आहे.

संजय राऊतांना आज आठवली वाजपेयींची कविता; काय आहे पाहा...

याविषयी बोलताना मलिक म्हणाले, की महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती सांगण्यासाठी पंतप्रधान यांची भेट शरद पवार घेत आहेत. आज काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक होईल त्यांनतर पुढे कसे जायचे ठरवले जाईल. किमान समान कार्यक्रमावर आज बैठकीत चर्चा केली जाईल, तो अजेंडा पक्ष नेतृत्वाला दिला जाईल. संजय राऊत त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत आहेत, राष्ट्रवादी पक्षाची भूमिका ते मांडत नाहीत. लवकरात लवकर तोडगा निघावा ही भूमिका आमची आहे.

शरद पवार-नरेंद्र मोदींची दिल्लीत होणार भेट; काय असेल?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLA Nawab Malik talked about Sharad Pawar Narendra Modi meeting