हो, अजितदादांच्या हातात कॅडबरी होती, कारण... : रोहित पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

अजित पवार भाजपसोबत गेल्याचे पहिल्यांदा टीव्हिवर पाहिल्यानंतर विश्वास बसत नव्हता, हे कशामुळे झाले. त्याच्या खोलात आम्ही गेलो नव्हतो. कुटुंब म्हणून धक्का बसला. हे कशामुळे झालंय कळत नव्हते. दादा हे आपलेच आहेत हा विश्वास आहे. दादांची काम करण्याची पद्धत माहिती होती ती पद्धत आघाडीसाठी महत्त्वाची आहे.

मुंबई : अजितदादा शरद पवार साहेबांना भेटले आणि महाआघाडीचे सरकार स्थापन झाले या गोड बातम्या होत्या. त्यांच्या हातात कॅडबरी होती की नाही नक्की माहिती नाही, पण आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण होता. सर्वकाही आता ठिक झाले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विधानसभेत काम करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

आज (बुधवार) शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकासआघाडीची नवी पहाट झाली असून, नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीला सुरवात झाली. २८  नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजता शिवाजी पार्कवर ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीला जाण्यापूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना रोहित पवार यांनी आनंद व्यक्त केला.

79 वर्षांच्या वस्तादाचे डाव पैलवानांना कळलेच नाही

रोहित पवार म्हणाले, की अजित पवार भाजपसोबत गेल्याचे पहिल्यांदा टीव्हिवर पाहिल्यानंतर विश्वास बसत नव्हता, हे कशामुळे झाले. त्याच्या खोलात आम्ही गेलो नव्हतो. कुटुंब म्हणून धक्का बसला. हे कशामुळे झालंय कळत नव्हते. दादा हे आपलेच आहेत हा विश्वास आहे. दादांची काम करण्याची पद्धत माहिती होती ती पद्धत आघाडीसाठी महत्त्वाची आहे. आम्ही पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याचा आनंद आहे. पवारसाहेब अस्वस्थ असले तरी ते कधीही दाखवत नाही. ते नेहमी परिस्थितीतून मार्ग कसा काढायचे हे पाहत असतात. कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी ठरविलेले ही अडचण नक्की सुटेल. काल या दोघांची भेट घेतल्यानंतर हेच राज्याला दिसत आहे. कुटुंब फोडण्याची भाजपची भिती कायम असते. त्यांना विकासाशी काही संबंध नाही. त्यांची पद्धत फोडाफोडीचीच असते. महाराष्ट्रातही हेच त्यांनी अवलंबिले. अजित पवारांबाबतही हेच झाले असे वाटते. अजितदादा हे कुटुंबातील महत्त्वाची व्यक्ती आहेत. कुटुंबावर संकट येत असेल तर कुटुंबातील सदस्यांनी मनधरणी करणे यात काय चूक आहे. अजितदादांनीही अनेक जणांशी बोलणी केली होती. आमचे कुटुंब एक आहे आणि एकच राहणार.  

महाविकासआघाडीची उजडली 'पहाट'; आमदारांचे शपथविधी सुरु


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLA Rohit Pawar talked about Ajit Pawar return in NCP party