अजित पवारांसोबत गेलेल्या दोन आमदारांनी सांगितले, आम्हाला...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

आम्ही शरद पवार यांच्यासोबत आहोत. आम्ही गायब होतो अशा अफवा पसरविण्यात येत आहेत. आम्ही दिल्लीत होतो. तेथून आम्ही शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात होतो. आम्हाला कोणी घेऊन गेले नव्हते. भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार बनणार असे आम्हाला सांगितले होते, असे आज परतलेल्या दौलत दरोडा यांनी सांगितले.  

मुंबई : भाजपसोबत गेलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन आमदारांनी पुन्हा पक्षात परत आल्यानंतर घडलेल्या घडामोडींविषयी माहिती दिली. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

आज (सोमवार) राष्ट्रवादीचे गायब असलेले तीन आमदार पुन्हा मुंबईत परतले आहेत. त्यांनी आम्ही शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आता 54 पैकी 51 आमदार शरद पवारांच्या पाठिशी असल्याचे दिसत आहे. अजित पवारांच्या पाठिशी आता त्यांच्यासह फक्त तीन आमदार आहेत. 

भाजपचा डाव उधळून लावण्याची तयारी 

आम्ही शरद पवार यांच्यासोबत आहोत. आम्ही गायब होतो अशा अफवा पसरविण्यात येत आहेत. आम्ही दिल्लीत होतो. तेथून आम्ही शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात होतो. आम्हाला कोणी घेऊन गेले नव्हते. भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार बनणार असे आम्हाला सांगितले होते, असे आज परतलेल्या दौलत दरोडा यांनी सांगितले.  

उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याने अजित पवारांचे बंड 

तर, अनिल पाटील म्हणाले, की गेल्या दोन दिवसांपासून आमच्यावर आरोप होतो, फुटीरवादी. पण असे काही नाही. अजित पवारांनी बोलविल्यामुळे आम्ही तेथे गेलो होतो. तेथे शपथविधी झाल्यानंतर आम्ही दिल्लीला गेलो. तेथून पवारसाहेबांना फोन केला आणि त्यांना पक्षाची भूमिका विचारली. त्यांनी आपण शिवसेना आणि काँग्रेससोबत असल्याचे सांगितले. आमची सुटका करावी, असे आम्ही शरद पवारांना सांगितल्यानंतर आमची सुटका करण्यात आली. आम्ही गेलो होतो तेथे भाजप कार्यकर्ते आणि पोलिस होते. पवारसाहेबांना पाठविलेल्या कार्यकर्त्यांमुळे आम्ही बाहेर पडू शकलो. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLAs Daulat Daroda and Anil Patil talked about political situation