पवार कुटुंब एकत्रच; सुप्रिया सुळेंच नवं स्टेट्स

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

सुप्रिया सुळे यांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या स्टेट्सवरून बरेच काही सांगण्याचा प्रय़त्न केलेला आहे. आजही त्यांनी स्टेट्सला बाबा शरद पवार, दादा अजित पवार आणि पी भाई म्हणजे प्रफुल्ल पटेल यांच्यासह जेवण केल्याचे म्हणत खेकड्याच्या भाजीचा फोटो शेअर केला आहे.

मुंबई : अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पवार कुटुंबात फूट असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पण, तीन दिवसांतच अजित पवार पुन्हा परतल्याने पवार कुटुंब एकच असल्याचे सिद्ध झाले होते. आता आजही हे सर्व एकच असल्याचे समोर आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांना स्टेट्सला शरद पवार, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह एकत्र जेवण केल्याचा फोटो प्रसिद्ध केला आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

सुप्रिया सुळे यांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या स्टेट्सवरून बरेच काही सांगण्याचा प्रय़त्न केलेला आहे. आजही त्यांनी स्टेट्सला बाबा शरद पवार, दादा अजित पवार आणि पी भाई म्हणजे प्रफुल्ल पटेल यांच्यासह जेवण केल्याचे म्हणत खेकड्याच्या भाजीचा फोटो शेअर केला आहे. त्यानंतर त्यांनी सुपर्ब असे म्हटल्याने पवार कुटुंबातील सर्व मतभेद संपुष्टात आल्याचे दिसत आहे.

मी आज शपथ घेणार नाही : अजित पवार

अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन शनिवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला होता. यानंतर वेगवान राजकीय घडामोडी घडत राष्ट्रवादीने अजित पवारांना गटनेतेपदावरून हटवत राष्ट्रवादी त्यांच्यामागे नसल्याचे म्हटले होते. पण, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्व चित्र बदलले अन् अजित पवारांनी राजीनामा दिला. पुरेसे संख्याबळ नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनाही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकासआघाडीची स्थापना होऊन नवे सरकार स्थापन होत आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवारही आता मी पूर्वी, आता आणि पुढेही राष्ट्रवादीच राहील असे स्पष्ट केले आहे. आता सर्वकाही ठीक झाले असून, अजित पवार हे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

राज्यात आजपासून उद्धव सरकार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MP Supriya Sule new whatsapp status for Pawar Family