आमच्यात दुरावा नव्हताच, आगे आगे देखो होता है क्या : सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

राज्यात शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. आमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी आमच्यावर आली आहे. आमच्यात दुरावे नव्हतेच सर्वकाही सुरळीत होईल. आमच्याकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचे कधी होणार नाही.

मुंबई : आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी ऐक्य दाखविले त्याबद्दल त्यांचे आभार. अजित पवार आणि आमच्यात कोणताच दुरावा नव्हता. आगे आगे देखो होता है क्या, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यातील जनतेला एकामागून एक धक्के देणाऱ्या राजकीय नाट्याचा अखेरचा अंक मंगळवारी सुरू झाला. अजित पवारांनी ऐनवेळी साथ दिल्याने स्थापन झालेले देवेंद्र फडणवीस सरकार, त्यांनीच ऐनवेळी साथ सोडल्याने कोसळले. सत्ता स्थापण्यास उत्सुक असलेल्या महाविकास आघाडीने हातातोंडाशी आलेला घास पुन्हा न गमाविण्यासाठी वेगवान हालचाली करत अधिकृतपणे आघाडीची घोषणा केली आणि लगोलग शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तास्थापनेचा दावा केला. २८  नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजता शिवाजी पार्कवर ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. ‘सर्व काही जनतेच्या हितासाठी’ या नावाखाली घडणाऱ्या या अतिवेगवान राजकीय घडामोडींमुळे सामान्य जनताही अवाक् झाली. आज आमदारांचा शपथविधी होत आहे. त्यानिमित्त सुप्रिया सुळेही विधानभवनात उपस्थित होत्या.

79 वर्षांच्या वस्तादाचे डाव पैलवानांना कळलेच नाही

सुळे म्हणाल्या, की राज्यात शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. आमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी आमच्यावर आली आहे. आमच्यात दुरावे नव्हतेच सर्वकाही सुरळीत होईल. आमच्याकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचे कधी होणार नाही. आम्ही स्थिर सरकार देणार. ज्या संघर्षातून आमच्या आमदारांनी ऐक्य दाखविले आहे. त्यांना आमचा मानाचा मुजरा. आमच्यात कोणतेच दुरावे नव्हते. सगळ्यांची मेहनत फळाला आली. 

राजकारणापेक्षा कुटुंब महत्त्वाचे म्हणत माघारी आले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MP Supriya Sule talked about Ajit Pawar And new government in Maharashtra