esakal | पवारांचा 'तो' फोटो स्टेट्सला ठेवून सुप्रिया सुळे म्हणतात, पुन्हा नव्याने टीम बांधू
sakal

बोलून बातमी शोधा

NCP

शरद पवार यांचे साताऱ्यातील पावसातील सभेचा फोटो ठेवताना त्यांना हे चित्र आयुष्यभर लढण्याची, संघर्ष करण्याची प्रेरणा देत राहील, असे म्हटले आहे. तसेच द टेलिग्राफ या वृत्तपत्राने शनिवारच्या सत्तानाट्यावर मुख्य बातमीचे 'We the idiots' असे शिर्षक केल्याचेही कात्रण ठेवले आहे. त्यानंतर स्टेट्सला लिहिताना त्या म्हणतात, की तत्वांचा कधीच पराभव होत नाही.

पवारांचा 'तो' फोटो स्टेट्सला ठेवून सुप्रिया सुळे म्हणतात, पुन्हा नव्याने टीम बांधू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे व्यथित झालेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (रविवार) शरद पवारांचा साताऱ्यातील त्या पावसातील सभेचा फोटो स्टेट्सला ठेवून पुन्हा आपण मिळून पुन्हा नव्याने टीम बांधू असे म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या साथीने काल (शनिवार) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला होता. अजित पवारांनी काही आमदारांसह राजभवनात शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीने आपला याला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच सुप्रिया सुळे यांनीही पक्षात आणि कुटुंबात फूट पडल्याचे स्टेट्स ठेवले होते. सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात अश्रू तरावले होते. आता आज पुन्हा एकदा स्टेट्स ठेवून कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली आहे.

शरद पवारांसोबत 51, तर अजित पवारांकडे फक्त 3 आमदार

शरद पवार यांचे साताऱ्यातील पावसातील सभेचा फोटो ठेवताना त्यांना हे चित्र आयुष्यभर लढण्याची, संघर्ष करण्याची प्रेरणा देत राहील, असे म्हटले आहे. तसेच द टेलिग्राफ या वृत्तपत्राने शनिवारच्या सत्तानाट्यावर मुख्य बातमीचे 'We the idiots' असे शिर्षक केल्याचेही कात्रण ठेवले आहे. त्यानंतर स्टेट्सला लिहिताना त्या म्हणतात, की तत्वांचा कधीच पराभव होत नाही. प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम कधीच वाया जात नाहीत. मार्ग कठीण असला तरी भविष्यासाठी फायद्याचा असतो. आयुष्यातला एखादा दिवस आपल्याला आणखी कणखर बनवत असतो. या कठीण काळातून आपण सगळे बाहेर येवू. स्वाभिमान बाळगा! सत्याच्या बाजूने रहा! प्रामाणिकपणा, नैतिकता आणि कष्ट यांची ताकद उद्या लोकांची सर्वोत्तम सेवा करण्याचं बळ देतील.

अजित पवार यांच्या सहा वर्षांतील तीन चुका; राजकीय कारकिर्द धोक्यात?