राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पटेल, पियूष गोयल यांचं विधान; तटकरे म्हणाले असं काही झालंच नाही

Sunil Tatkare on Piyush Goyal : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी केलेल्या विधानानंतर खळबळ उडाली आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी प्रतिक्रिया दिलीय.
prafull patel and sunil tatkare
prafull patel and sunil tatkaresakal
Updated on

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी शनिवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. दरम्यान, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आल्याचं विधान केलंय. या विधानामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. पियूष गोयल यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com