Shivsena: "जे पेरलं तेच उगवलं" , शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओवर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

shital mhatre
shital mhatreesakal

शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक मॉर्फ व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत सामील झाले होते.

या रॅलीतील शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा व्हिडीओ मॉर्फ करून त्यावर अश्लील मजकूर करून व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेतून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान आता या व्हिडीओवर सर्व क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

shital mhatre
Shivsena : शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे अन् आमदार प्रकाश सुर्वे यांचा मॉर्फ व्हिडीओ व्हायरल

या प्रकरणावर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, ज्यांनी कुणी हा व्हिडिओ व्हायरल केला असेल त्यांच्यावर तात्काळ कारवाई होणं गरजेचं आहे. महिला म्हणून आम्ही शीतल म्हात्रे यांच्या पाठीशी आहोत, पणं जे पेरल तेच उगवलं आहे.

त्याचा त्रास तुम्हाला होताना दिसत आहे. अशी टीका रूपाली पाटील यांनी म्हात्रेच्या कथित व्हायरल व्हिडिओ वर केलीय.तर आम्ही विरोधात असलो तरी त्यांच्या पाठीशी आहोत. असे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणं निंदनीय आहे.

भाजप आणि शिंदे गटातील काही जणांनी ही अशा अनेक महिलांचे व्हिडिओ करून टाकतात त्यांच्यावर कारवाई केली नाही, त्यामुळे ही हिम्मत वाढली आहे. व्हिडिओ खरा आहे की खोटा हे तपास केल्याशिवाय कळणार नाही. सार्वजनिक ठिकाणी राजकारणी महिला अशी कृत्य करतील असे वाटत नाही.

shital mhatre
Narayan Rane: येत्या दोन महिन्यात नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार, कोकणातल्या नेत्याचा गौप्यस्फोट

आता गृहमंत्र्यांनी ताबडतोब चौकशी करुन कारवाई करावी.तसेच सोशल मीडियावर जेजे अंधभक्त व्हिडिओ करून टाकतात त्यांच्यावर ही त्वरित कारवाई करावी ही मागणी आहे.

ठाकरे गटातील कोणताही व्यक्ती अस करु शकत नाही. भाजप आणि शिंदे गट सातत्याने बदनामी करत आहे. आमचीही बदनामी करण्याचं काम भाजप आणि शिंदे गटाच आहे. ठाकरे गटातील कुठलीही व्यक्ती अस करणार नाही, याची चौकशी करा.

टीका करायची म्हणून बोलू नका. तुमच्यावर वेळ आली म्हणून तुम्हाला दुःख कळत,पणं अशी वेळ अनेक महिलांवर आली यावर गप्प बसतात, आता तुम्ही यंत्रणा कामाला लावा. हे जर खर असेल तर तश्या प्रकारचा विनय भंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. बदनामी केली हा गुन्हा ही दाखल होऊ शकतो.

पण यात जर अंध भक्तच निघाले तर सत्ताधारी काय करणार तेही सांगावं नाहीतर आमच्या ताब्यात द्यावं... आम्ही त्यांना फोडून काढतो, परत व्हिडिओ शूटिंग करायला हात पुढे राहणार नाही. पण मी खात्रीशीर सांगते जबाबदारी ने सांगते सोशल मीडियावर हे व्हायरल होणे घातक आहे. गृह खात्याने जागे होऊन यावर त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com