MLC Election 2022: उद्या भाजपलाच धक्का बसू शकतो, रोहित पवारांचा इशारा

NCP rohit pawar on vidhan parishad election 2022 bjp mla votting for ncp congress
NCP rohit pawar on vidhan parishad election 2022 bjp mla votting for ncp congress

मुंबई : महाराष्ट्राच्या विधान परिषदेची निवडणूक अवघ्या एक दिवसावर आलेली आहे, या दरम्यान सर्व राजकीय पक्षांकडून आमदारांच्या मताची फोडाफोडी होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे, यादरम्याम महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये एकत्र ठेवण्यात आले आहे, या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (NCP rohit pawar on vidhan parishad election 2022 bjp mla votting for ncp congress)

राज्यसभेच्या निवडणूकीत अपेक्षा वेगळ्या होत्या शिवसेनेचं एक मत बाद झालं, समिकरण बसलं होतं, भाजपने वेगवेगळे डाव टाकून विजयी झालं, मात्र उद्या होणाऱ्या विधान परिषद निवडणूकीत भाजप काय करू शकते ते सगळ्यांच्या लक्षात आलं आहे, त्यामुळे काळजी घेत निवडणूक लढली जाईल असे रोहित पवार म्हणाले.

सर्व आमदार विश्वासानं मतदान करतील, कॉंग्रेसला काही मतं कमी आहेत त्यांना शिवसेना मदत करेल असा विश्वास रोहित पवारांनी यावेळी व्यक्त केला, तसेच अपक्ष आणि कदाचित भाजपचे देखील अनेक आमदार देखील राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करतील असे समिकरण उद्या आपल्याला पाहायला मिळेल असे रोहित पवार म्हणाले. भाजपलाच काही ठराविक आमदारांकडून आणि अपक्ष आमदारांकडून उद्या धक्का बसण्याची शक्यता आहे, असा खुलासा आमदार रोहित पवार यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान आज शिवसेनेचा आज ५६वा वर्धापन दिन असून हॉटेल वेस्टइन इंथ हा सोहळा पार पडला. वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री आणि शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हॉटेलमधील आमदारांशी प्रत्यक्ष तर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर विविध मुद्द्यांवरुन टीका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com