

Prajakt Tanpure Join BJP
ESakal
मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राहुरी तालुक्यातील नेते प्राजक्त तनपुरे शनिवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शनिवारी प्रदेश कार्यालयात प्रवेश सोहळा होईल. तनपुरे यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी भाजप प्रवेशाची माहिती दिली.