अखेर सत्ता समिकरण बदलणार..!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

शिवसेना-राष्ट्रवादी-काॅंग्रेस केंद्रस्थानी

मुंबई : भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा नाकारल्याने आता सत्तासिकरण पुर्णत: बदलण्याचे चित्र आहे. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व काॅग्रेस अशी नवी आघाडी समोर येण्याची शक्यता वाढली आहे. शिवसेनेनं मुख्यमंत्री पदावरचा दावा कायम ठेवल्याने भाजप सोबतची युती फिस्कटली. आता शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादी व काॅग्रेसने सहमतीचे संकेत दिले असून राज्यपालांनी सेनेला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शिवसेना व राष्ट्रवादी प्रत्यक्ष सत्तेत जाणार असले तरी काॅग्रेस मात्र सत्तेत सहभागी न होता बाहेरून पाठिंबा देईल असे सांगण्यात येते. त्यासाठी काॅग्रेसच्या आमदारांनी पक्षश्रेष्ठीवर दबाव टाकला असून परवानगी मिळाली नाही तर विधीमंडळात चाळीस आमदारांचा स्वतंत्र गट तयार करण्याचा इशारा या आमदारांनी दिला आहे. शरद पवार यांच्याशी शिवसेनेचे नेते संजय राऊत सतत संपर्कात असल्याने राष्ट्रवादी व शिवसेनेची जवळीक वाढली आहे. 

संजय राऊत यांचे पुन्हा ट्विट आणि पुन्हा...

जनतेनं विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिल्याचे पवार म्हणत असले तरी भाजप शिवसेनेनं सत्ता स्थापन केली नाही तर पर्यायी सरकार राज्याला देण्याची तयारी राष्ट्रवादीची असल्याचे त्यांच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. त्यातत शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपची आवश्यकता नाही असे उध्दव ठाकरे यांनी जाहिर केले आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना राष्ट्रवादी व काॅग्रेस यांचे सरकार स्थापन होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. 

पक्षिय बलाबल 
शिवसेना 56 
राष्ट्रवादी 54 
काॅग्रेस 45 
अपक्ष व इतर 10 
एकूण : 164 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Shiv Sena and Congress may make Government in maharashtra