
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपल्याच पाहायला मिळतंय.
चित्रा वाघांनी 'ही' निवडणूक कुठल्याही वार्डातून लढवून दाखवावी : विद्या चव्हाण
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी (NCP) आणि भाजपमध्ये (BJP) चांगलीच जुंपल्याच पाहायला मिळतंय. एकीकडं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीला लक्ष केलंय, तर दुसरीकडं भाजपचे नेते शिवसेना (Shiv Sena)-काॅंग्रेसवर निशाणा साधत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी थेट चित्रा वाघांनाच (Chitra Wagh) निवडणुकीसाठी चॅलेंज केलंय, त्यामुळं राष्ट्रवादी-भाजपात पुन्हा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
अफाट लोकप्रिय असणाऱ्या 'लोकनेत्या' स्वतःवर व बदलेल्या पक्षावर विश्वास असेल, तर पोपटपंची बंद करून चित्रा वाघ यांनी मुंबई महानगर पालिकेच्या (Mumbai Municipal Corporation Election) कुठल्याही वार्डातून निवडणूक लढवून दाखवावी, असं थेट आव्हान विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी ट्विटव्दारे भाजप नेत्या चित्रा वाघ यांना दिलंय. त्यामुळं चित्रा वाघ राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांचं आव्हान स्वीकारणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा: आम्ही मेलोय का? मला सत्तेशी काही देणं-घेणं नाही; आमदार शिंदे भडकल्या
दरम्यान, काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली नागवडे (Vaishali Nagawade) यांना पुण्यातील कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांनी (Pune BJP) श्रीमुखात भडकावल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी अधिकच आक्रमक झालीय. भाजप कार्यकर्त्यांनी लगावलेली ही थप्पड फक्त राष्ट्रवादीच्या (Pune NCP) कार्यकर्त्यावरच नव्हे, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक आया-बहिणीच्या तोंडावर दिली आहे. भाजपाला याचा हिशेब द्यावाच लागेल. भाजपाला माफी मागावी लागेल, असा पवित्राही राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी घेतलाय. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पुण्यातील एका कार्यक्रमात वैशाली नागवडे महागाईविरोधातील निवेदन देण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, यावेळी वैशाली यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय.
Web Title: Ncp Women State President Vidya Chavan Challenges Bjp Leader Chitra Wagh For Mumbai Municipal Election
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..