महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत? NCRBचा अहवाल समोर; महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांत महाराष्ट्राचा क्रमांक...

सायबर गुन्हेगारीचे मोठे आव्हान देशापुढे उभे असताना महाराष्ट्र या गुन्ह्यांत देशात दुसऱ्या स्थानावर आहे.
महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत? NCRBचा अहवाल समोर; महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांत महाराष्ट्राचा क्रमांक...

NCRB Report Crime Against Women: सायबर गुन्हेगारीचे मोठे आव्हान देशापुढे उभे असताना महाराष्ट्र या गुन्ह्यांत देशात दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे सायबरच्या माध्यमातून महिलांच्या लैंगिक शोषणातही राज्यात सर्वाधिक गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची धक्कादायक बाब नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) यांच्या अहवालातून समोर आली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये मोबाइलच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारी वाढली आहे. यात एकीकडे बॅंकेतील पैसे अधिक नफ्याच्या माध्यमातून वळवून त्यातून आर्थिक फसवणूक केल्या जाते. तर दुसरीकडे या गुन्ह्यांच्या माध्यमातून समाजाचे स्वास्थ्य बिघडविण्याचेही काम मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे.

महिलांच्या बाबतीत सायबर गुन्हेगारीत त्यांच्या लैंगिक शोषणाचे प्रमाणही वाढले आहे. यामध्ये महिलांबाबत अश्‍लिल साहित्य पोस्ट करीत, त्यांची बदनामी करून त्यातून आर्थिक लुट करण्याचे काम केले जाते. महाराष्ट्रात यासंदर्भात ७८७ गुन्हे दाखल असून ते उत्तरप्रदेशच्या तुलनेतही जास्त आहे. विशेष म्हणजे महिलांसदर्भातील गुन्ह्यातही राज्य दुसऱ्या स्थानावर असून २ हजार ५३० गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे.(Latest Marathi News)

महिलांसंदर्भातील सायबर क्राईम

कर्नाटक ३,९०४

महाराष्ट्र २,५३०

आंध्र प्रदेश ६३७

महिलांचे लैंगिक शोषण

महाराष्ट्र - ७८७

उत्तर प्रदेश - ५४२

राजस्थान - २७१

महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत? NCRBचा अहवाल समोर; महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांत महाराष्ट्राचा क्रमांक...
Parliament Security Breach : लोकसभेतील घुसखोरी प्रकरणानंतर आता नागपूर अधिवेशनातही आता गॅलरी पासेस देणं केलं बंद

अश्लील साहित्य टाकण्याचेही गुन्हे

राज्यातील महिलांवर सायबरच्या माध्यमातून लैंगिक अत्याचारात वाढ झालेली असतानाच, त्यांच्याबाबत समाजमाध्यमांवर अश्लील साहित्य टाकण्यासंदर्भात ७५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे यातून महिलांची बदनामी करण्यावर सायबर गुन्हेगारांचा रोख असल्याचे दिसून येते. याशिवाय ब्लॅकमेलिंग, फेक प्रोफाइल आणि सायबर गुंडगिरीच्या माध्यमातूनही महिलांना टारगेट केले जात आहे. (Latest Marathi News)

महिलांसंदर्भातील इतर गुन्हे

क्राईम अगेन्ट्स विमेन - ब्लॅकमेलिंग - ११

अश्‍लील साहित्य टाकणे - ७५

सायबर गुंडगिरी - ५७८, बदनामी करणे - ३

फेक प्रोफाइल - २७, इतर - १,८३६

एकूण २,५३०

महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत? NCRBचा अहवाल समोर; महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांत महाराष्ट्राचा क्रमांक...
Parliament Security Breach: लोकसभेत घुसखोरी करणाऱ्यांना ज्यांच्या शिफारसीनं पास मिळाले ते खासदार कोण? जाणून घ्या सविस्तर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com