केंद्राची अवस्था म्हणजे ‘बोलाची कढी...’ - नीलम गोऱ्हे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

‘अवघ्या दहा रुपयांत थाळी,’ ही संकल्पना नुकतीच रुजू झाली आहे. त्याचा महिलांना उद्योगक्षेत्र म्हणून कसा उपयोग करून घेता येईल, हे पाहायला हवे. या योजनेला केंद्र सरकारचा निधी आहे. मात्र, त्यांची अवस्था बोलाची कढी, बोलाचा भात याप्रमाणे आहे, अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

पुणे - ‘अवघ्या दहा रुपयांत थाळी,’ ही संकल्पना नुकतीच रुजू झाली आहे. त्याचा महिलांना उद्योगक्षेत्र म्हणून कसा उपयोग करून घेता येईल, हे पाहायला हवे. या योजनेला केंद्र सरकारचा निधी आहे. मात्र, त्यांची अवस्था बोलाची कढी, बोलाचा भात याप्रमाणे आहे, अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहा’मध्ये ‘पर्व स्त्रीशक्तीचे - महिला स्वयंरोजगार, मार्केटिंग व व्यक्तिमत्त्व विकास’ या शिबिरात डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. या वेळी माजी आमदार मोहन जोशी, ॲड. कमल सावंत, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर आदी उपस्थित होते. हैदराबाद येथील घटनेचा काळ्या फिती लावून निषेध करून, पीडित महिलेला आदरांजली वाहण्यात आली.

आणखी वाचा - 'हिंदूंना नागरिकत्व द्या, पण एक अधिकार देऊ नका'

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘महिला अत्याचाराच्या घटना सर्वत्र वाढत आहेत, त्यामुळे महिलांनी योग्य वेळी प्रतिकार करणे व स्वमदत गट मोठ्या संख्येने तयार करणे महत्त्वाचे आहे. महिलांना मदत करण्याच्या कार्याला संस्थात्मक रूप मिळाल्यास महिलांना खरी मदत होईल.’’ 

आणखी वाचा - मला उपमुख्यमंत्री करा, पण...

अनास्कर म्हणाले, ‘‘भारतात केवळ ५२ टक्के नागरिक बॅंकिंगच्या माध्यमातून बचत करतात, त्यामध्ये महिलांचे प्रमाण हे अवघे १२ टक्के इतकेच आहे. महिलांनी पैशांची बचत स्वतःजवळ केली, तर तो पैसा अनुत्पादित राहतो, त्यामुळे बॅंकेच्या माध्यमातून पैशांची बचत व वृद्धी करण्याचा प्रयत्न  करायला हवा.’’ या वेळी जोशी यांचे भाषण झाले. योगेश सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले. अर्चना शहा यांनी आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: neela gorhe talking about central government