

Abhjit Dipke
esakal
देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित नीट परीक्षा घोटाळ्यावरुन दिल्लीत मोठे आंदोलन उभे करणारी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आज गुरुवारी आपल्या पुढील वाटचालीबाबत आणि विस्ताराच्या योजनांबाबत महत्त्वाची घोषणा करणार आहे. संघटनेचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओ संदेशात सांगितले की, गेल्या दोन दिवसांत छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलनाच्या पुढील टप्प्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.