
राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र शपथ घेऊन आता दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर फडणवीस गेलेले नाहीत. आता या बंगल्याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक असा दावा केलाय. वर्षावर जादू टोणा केल्यानंच फडणवीस पुन्हा या बंगल्यात जाण्यास तयार नाहीत. वर्षावर गेलो तरी रात्री तिकडे झोपणार नाही असं फडणवीसांचं म्हणणं असल्याचा दावा राऊतांनी केलाय.