लाडक्या बहिणींसाठी नवे नियम? लाभार्थी इन्कम टॅक्सच्या रडारवर, अपडेट आले समोर

Ladki Bahin Yojana : सरकारकडून आता नवे नियम लागू केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेचा हफ्ता आता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याला दिला जाणार आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaEsakal
Updated on

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र लाभार्थ्यांना लाभ सोडण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय. आतापर्यंत साडे पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. दरम्यान, सरकारकडून आता नवे नियम लागू केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेचा हफ्ता आता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याला दिला जाणार आहे. तर अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास योजनेचा लाभ घेता येणार नाही. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेमुळे इतर मोफत योजनांना लागणार कात्री? काय आहे अर्थ विभागाचा प्लॅन? पैसे बचतीसाठी सरकारची धडपड
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com