

Breath Analyzers In MSRTC ST Bus
ESakal
सकाळ वृत्तसेवा
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पुढील वर्षात दाखल होणाऱ्या नव्या बसेसमध्ये चालकाजवळ ब्रेथ अॅनालयझर यंत्र बसविण्यात येणार आहे. या यंत्रामुळे चालकाने मद्यपान केले असल्याचे आढळल्यास बसचे इंजिन सुरू होणार नाही, म्हणजेच मद्यधुंद अवस्थेत बस चालवणे पूर्णपणे थांबवले जाईल.