NIA Action : महाराष्ट्रासह कर्नाटकात NIA चे छापे, अल कायदाच्या संपर्कतील सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक NIA raids in Maharashtra, Karnataka, software engineer arrested after links to Al Qaeda | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NIA

NIA Action : महाराष्ट्रासह कर्नाटकात NIA चे छापे, अल कायदाच्या संपर्कतील सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक

राष्ट्रीय तपास संस्थेने महाराष्ट्रात आणि कर्नाटकात काही ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईवेळी बेंगळुरू येथून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली आहे. तसेच एनआयने मुंबई येथून एकाला ताब्यात घेतले आहे. अल-कायदा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात तो असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मोहम्मद आरिफ असे त्याचे नाव आहे.

तर आरिफ गेल्या दोन वर्षांपासून अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता, असा दावा एनआयएने केला आहे. एवढेच नाही तर तो लवकरच इराण आणि अफगाणिस्तानला जाण्याच्या तयारीत होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आरिफ अफगाणिस्तानात जाऊन दहशतवादी संघटनेत सामील होण्याच्या तयारीत होता, एनआयएने त्याला आधीच बेंगळुरू येथून अटक केली आहे. आरिफ बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो. दोन वर्षांपूर्वी त्याने इंटरनेटच्या माध्यमातून अल कायदाच्या संबधितांशी संपर्क केला होता. जेव्हा जेव्हा आरिफला अल कायदाच्या दहशतवाद्यांशी संपर्क साधायचा होता तेव्हा तो इंटरनेटच्या मदतीने त्यांच्याशी संपर्क साधायचा. परंतु तो अजूनपर्यंत कोणत्याही कारवाईमध्ये सहभागी झालेला नव्हता.

मोहम्मद आरिफ याला बंगळुरू येथून अटक केली. त्यानंतर NIA ने महाराष्ट्रातील ठाणे आणि पालघरमध्येही शोधमोहीम राबवण्यात आली होती. पालघरमधील हमराज वर्सिद शेख याला ताब्यात घेतले. तो बोईसरमधील अवधनगर येथील सोमनाथ पैराडाइज सोसायटी राहतो. त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. हमराज सौदी अरेबियात कामासाठी गेला होता आणि तो ISIS च्या संपर्कात होता तर मोहम्मद आरिफ हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. तो बंगळुरू येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता.

टॅग्स :ActionNIA