esakal | सेनेचे मंत्री म्हणतात, 'लाश वही है सिर्फ कफन बदला गया'
sakal

बोलून बातमी शोधा

Gulabrao Patil Narendra Modi

सेनेचे मंत्री म्हणतात, 'लाश वही है सिर्फ कफन बदला गया'

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : पश्चिम बंगाल निवडणुकीत टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांना भरघाेस यश मिळाले आहे. या धर्तीवर महाराष्ट्रातील नेते वेगवगेळ्या माध्यमातून पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालावर भाष्य करु लागले आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे.

भाजपकडे राज्यातील नेतृत्व करणारा नेता नव्हता. भाजपला चपराक बसली आहे असे महाराष्ट्राचे पाणी पूरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रया व्यक्त केली. ते म्हणाले काेणाचा करिष्मा आहे यापेक्षा राज्याचा विकास आणि राज्य मातीशी काेण जुळला आहे याला महत्व जास्त आहे.

माेदींकडे किंवा भारतीय जनता पार्टीकडे गेलेले नेते काेण हाेते ते सर्वांना माहित आहे. ज्यांच्याकडे अपत्य नव्हती तीच अपत्य ममतांची पळवली हाेती. त्यामुळे लाेकांनी ही हुशारी दाखवली आहे. लाश वही है सिर्फ कफन बदला गया आहे. लाेकांनी या गद्दारीला सुद्धा चपराक दिली आहे.

देशात मागील २४ तासांत कोरोनाचे ४ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत

फक्त औपचारिकता बाकी आहे जयघोषाची...

loading image
go to top