मुख्यमंत्री आजारी आहेत, तर तब्येतीची माहिती जाहीर का करत नाहीत? निलेश राणेंचा सवाल I Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत कुठे? अगोदर पासून ते असून नसल्यासारखे - निलेश राणे

मुख्यमंत्री आजारी आहेत, तर तब्येतीची माहिती जाहीर का करत नाहीत?

मानदुखीचा त्रास वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. या शस्त्रक्रियेमुळे डॉक्टरांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना आठवडाभर विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान या मुद्द्यावरून त्यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री रुग्णालयात आहेत तर कारभार इतरांवर का सोपवत नाहीत अशी टीकाही करण्यात आली होती. आता पुन्हा भाजपाचे निलेश राणे यांनी ट्विट करून मुख्यमंत्री कुठे आहेत ? असा खोचक सवाल केला आहे.

ते म्हणतात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत कुठे? अगोदर पासून ते असून नसल्यासारखे होते, पण जर ते आजारी आहेत. आजारी आहेत तर मुख्यमंत्री कार्यालय त्यांच्या तब्येतीची माहिती जाहीर का करत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आह

हेही वाचा: एसटी कर्मचाऱ्यांचा गिरणी कामगार करायचाय का - संजय राऊत

दरम्यान, मुख्यमंत्री आजारी आहेत तर त्यांनी किमान चार्ज डेप्युटीला दिला पाहिजे. ते चार्ज का सोडत नाहीत असा सवालही त्यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांचा कोणावरही विश्वास नाही. महाराष्ट्राला नावाचाही मुख्यमंत्री नाही हे बरोबर नाही. महाराष्ट्राचे प्रश्‍न बिकट होत चालले आहेत. लोकांची परिस्थिती बिघडत चालली आहे, कधी तरी राज्याचा विचार करा, असा सल्लाही त्यांनी दिला होता.

हेही वाचा: जनता दलामुळेच 'मॅजिक फिगर' ओलांडली - सतेज पाटील

loading image
go to top