पवार साहेब तुमच्या तालुक्यात नेमकं चाललय काय? निलेश राणेंचा सवाल; Nilesh Rane | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar, Nilesh Rane

पवार साहेब तुमच्या तालुक्यात नेमकं चाललय काय? निलेश राणेंचा सवाल

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

पवार साहेब तुमच्या तालुक्यात नेमकं चाललय काय? रेमडेसिविर बोगस लस तिथे तयार झाली, पिस्तूल ही तिथेच सापडल्या. आता सेक्स रॅकेट ही पोलिसांना आढळले आहे. बारामती तालुक्यात अशा विचित्र बातमी ऐकायला येत आहेत. त्यामुळे तुमच्या तालुक्यात नेमकं काय चाललंय असा सवाल निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केला आहे. बारामती येथील भाजी मंडईमध्ये पोलिसांना मोठे सेक्स रॅकेट (Sex Racket) सापडले आहे. यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या बातमी संदर्भात ट्विट करताना भाजपचे नेते राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Shard Pawar )यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मुंबई आणि पुण्यामध्येही याआधी सेक्स रॅकेटचा (Sex Racket) पर्दाफाश झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गालगत एका लॉजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा ऑक्टोबर महिन्यात पोलिसांनी पर्दाफाश केला होता. ऑक्टोबर महिन्यातच मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई केली होती. आणि आज बारामतीत हा प्रकार घडला. यावर राणेंनी शरद पवार यांना टोला लगावला आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, बारामती तालुक्यातून विचित्र बातम्या ऐकायला मिळतात. लॉकडाऊनच्या काळात पाहिलं बोगस रेमडिसिविर बनवण्याचं ठिकाण बारामती झालं होतं, पिस्तूलांची तस्करीची बातमी इथूनच आली होती. पवार साहेब नेमकं आपलं धोरण काय? रोज केंद्रावर टीका करता पण आपण १ तालुका नीट सांभाळू शकत नाही.असा घणाघात त्यांनी यावेळी घातला.

loading image
go to top