'राऊत तुमचा गजनी झालाय?, दहावी दोनदा नापास आहात, कायदे तज्ज्ञ कधीपासून झाला?'

अरविंद सावंत आणि दहावी दोनदा नापास खासदार विनायक राऊत कायदे तज्ञ कधीपासून झाले?
political news
political news
Summary

अरविंद सावंत आणि दहावी दोनदा नापास खासदार विनायक राऊत कायदे तज्ञ कधीपासून झाले?

मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक बदल पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर पुण्यात शिवसैनिकांकडून हल्ला झाला होता. यावरून शिवसेनेवर टीका करण्यात आली होती. आता निलेश राणे यांनी सेना नेते विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांनी यासंदर्भात ट्वीट करत शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत आणि विनायक राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. अरविंद सावंत आणि दहावी दोनदा नापास खासदार विनायक राऊत कायदे तज्ञ कधीपासून झाले?, असा खोचक सवला त्यांनी केला आहे.

political news
CM शिंदे एक-दोन तासच झोपतात; केसरकरांनी सांगितलं आजाराचं कारण

राणे ट्वीटमध्ये म्हणतात, सामंत यांच्यावरील हल्लासंदर्भात विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया ऐकली. या प्रकरणात विनायक राऊत यांच्यासारखे दोन वेळा दहावी नापास झालेले नेते कायदा शिकू लागले तर महाराष्ट्र संकटात येईल. दहावीमध्ये दोनदा नापास झालेल्या व्यक्तीचा कायद्याशी काही संबंध आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.

कायदा शिकवत 307 कलमाबद्दल राऊत बोलत आहेत. मागील अडीच वर्षांत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किती भाजपच्या तरुण कार्यकर्त्यांवर तुम्ही 307 ची केस टाकली आहे हे विसरलात का? सायबर क्राईम अंतर्गत किती मुलांना अटक केली आणि कित्येकांच्या आई-वडिलांना त्रास दिला हे सर्व विसरलात का?, असा सवालही त्यांनी केला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वतः पोलिस स्टेशनमध्ये फोन करून अधिकाऱ्यांना अनेकांवर 307 नुसार करावाई करण्याचे आदेश दिले होते, असाही खुलासा राणेंनी केला आहे.

political news
Congress Protest : पीएम हाऊसकडे निघालेल्या प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

पुढे ते म्हणाले की, विनायक राऊतांना सगळं माहिती असतानाही ते गजनी झाल्यासारखे का करत आहेत? असा खोचक सवालही त्यांनी केला आहे. लोक तिकडे काय करायला गेली होती हे सीसीटीव्हीमध्ये साफ दिसत आहे. नशीबाने त्यांचा जीव वाचला नाहीतर 302 ची केस पडली असती. त्यामुळे कायदा आणि हा सगळा विषय पोलिसांचा आहे. तो पोलिसांना आणि वकिलांना त्यांच्या पद्धतीने करू द्या. तुम्ही नाही त्या भानगडी पडू नका हा तुमचा विषय नाही, असा सल्लाही निलेश राणेंनी राऊतांना दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com