
नितेश राणेंच्या ट्विटमुळे आता पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना संघर्ष वाढणार का अशी चर्चा सुरु आहे.
'९३ च्या दंगलीनंतर बाळासाहेबांनी मुंबई वाचवली अन् मुलगा आरोपींना वाचवतोय'
मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वातावरणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेक कारणांवरून सत्ता संघर्ष पहायला मिळत आहे. काल राष्ट्रवादीचे नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक केल्यानंतर पुन्हा एकदा भाजपा आणि राष्ट्रवादीतील वाद पेटला आहे. दरम्यान, आता भाजपाचे नितेश राणे यांनी ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमुळे आता पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना (BJP-Shivsena) संघर्ष वाढणार का अशी चर्चा सुरु आहे. आमदार नितेश राणे (Nitesh Rane) ट्विटमध्ये म्हणतात, ९३ च्या दंगली नंतर मुंबई माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी वाचवली.
आज त्यांचाच मुलगा मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) असताना ९३ च्या दंगलीतील आरोपींना वाचवतो आहे. म्हणून, आता भगव्याची जबाबदारी आमची, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. आता त्यांच्या या ट्वीटमुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता दिसत आहे.
हेही वाचा: रशियातर्फे हल्ल्याची घोषणा, युक्रेनमध्ये 'स्पेशल ऑपरेशन' सुरू
दरम्यान, काल मंत्री नवाब मिलक यांच्यावरील ईडी (ED) कारवाईमुळं राजकीय वातावरण ढवळले आहे. आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या या ट्विटमुळे हे वातावरण कोणते नवे वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: 'बांग्लादेशी वेश्यांसोबतचे फोटो माझ्याकडे', भाजप नेत्याचा मलिकांवर आरोप
Web Title: Nitesh Rane Criticized On Uddhav Thackeray On Nawab Malik Ed Arrested
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..