नाना पटोलेंनी दिली नितीन गडकरींना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर; म्हणाले, मी लवकरच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari, Nana Patole Latest News

पटोलेंनी दिली गडकरींना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर; म्हणाले, मी लवकरच...

Nitin Gadkari, Nana Patole Latest News अकोला : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) भाजपमध्ये नाराज आहे. तेथील परिस्थिती चांगली नाही. त्यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याचे आमंत्रण देतो. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. लवकरच नितीन गडकरी यांची भेट घेणार, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

नाना पटोले हे अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी नितीन गडकरी यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. काँग्रेस हा लोकशाहीवादी पक्ष आहे. पक्षामध्ये कोणत्याही पदाधिकाऱ्याला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु, भाजपमध्ये तसे नाही. अलीकडे नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची पक्षात ज्या प्रकारची अवस्था झाली आहे, ती योग्य म्हणता येणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा: Ganesh Visarjan : महाराष्ट्रात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू; अनेक जखमी

नितीन गडकरी पक्षावर नाराज आहे. मी त्यांना आमच्यात सामील व्हा असे आमंत्रित करतो. आम्ही तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी तयार आहोत. केंद्र सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यावर ईडी-सीबीआय लादण्याची पद्धत आपल्याकडे नाही. याबाबत नितीन गडकरी यांच्याशी बोलणार आहोत. आम्ही नितीन गडकरी यांची भेट घेणार आहोत, असेही नान पटोले (Nana Patole) म्हणाले.

यूपीमध्येही भाजपला ऑफर

यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि योगी सरकारमधील उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्याबाबत ऑफर देण्यात आली होती. बिहारमधील राजकीय घडामोडीतून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी धडा घ्यावा, असे सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मुलाखतीत म्हटले होते. अखिलेश म्हणाले की, जर ते त्यांच्या १०० आमदारांसह सपामध्ये सामील झाले तर मी त्यांना मुख्यमंत्री करेन.

Web Title: Nitin Gadkari Bjp Nana Patole Congress Akola Political News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..