Nitin Gadkari Video : यवतमाळमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नितीन गडकरींना भोवळ! प्रकृती स्थिर, पुन्हा भाषणास सुरवात

Lok Sabha Election 2024 : राज्यासह देशात सध्या लोकसभा निवडणुकांची धूम पाहायला मिळत आहे.
Nitin Gadkari
Nitin Gadkariesakal

Nitin Gadkari Latest News : राज्यासह देशात सध्या लोकसभा निवडणुकांची धूम पाहायला मिळत आहे. यासोबतच राज्यात उन्हाचा कडाका देखील वाढला असून यामुळे आरोग्याच्या समस्या देखील तोंड वर काढताना पाहायला मिळत आहेत. यादरम्यान यवतमाळ वाशिम-लोकसभा मतदारसंघातल्या पुसद येथील सभेमध्ये मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आल्याचा प्रकार समोर आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना नितीन गडकरी यांना भोवळ आल्याने त्यांना लगेच येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातल्या पुसद येथील सभेमध्ये स्टेजवर बोलत असताना मंत्री नितीन गडकरी यांना अचानक भोवळ आली. गडकरी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचार सभेसाठी पुसदमध्ये आले होते. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून काही वेळात प्रचाराच्या तोफा थंडवणार आहेत.

Nitin Gadkari
Sharad Pawar : शरद पवारांनी भरसभेत ऐकवली PM मोदींची ऑडिओ क्लिप; भर सभेत केला हल्लाबोल

सध्या विदर्भात उन्हाचा पारा ४२ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त जात असून या उष्णतेमुळेच गडकरींना भोवळ आली असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान भोवळ आल्यानंतर काही वेळातचं गडकरींना बरं वाटयाला लागताच ते पुन्हा भाषणासाठी मंचावर आले आणि त्यांनी सभेसला संबोधित केलं.

Nitin Gadkari
Mukesh Ambani: अंबानींची नवीन व्यवसायात एन्ट्री! रिलायन्स देणार टाटा, सॅमसंग आणि एलजीला टक्कर; काय आहे प्लॅन?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com