
नितीन राऊतांना खरंच बैठकीचं निमंत्रण नव्हतं का? पटोले म्हणतात...
मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) अंतर्गत गटबाजीमुळे नाराजीनाट्य सुरू असल्याचं समोर आलं आहे. आज मुंबईत काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील देखील उपस्थित होते. पण, ऊर्जामंत्री नितीन राऊतांना (Nitin Raut) बैठकीचं निमंत्रण दिलं नव्हतं, अशी चर्चा आहे. त्याबाबतच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी खुलासा केला आहे.
हेही वाचा: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन
आज काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. यामध्ये मंत्रालयाबाबत कुठल्याही चर्चा नव्हत्या. त्यामुळे नितीन राऊत बैठीकाला अपेक्षित नव्हते. ते फक्त एच. के. पाटील यांना भेटायला आले होते. मंत्रालयात असलेल्या समस्या त्यांनी पाटील यांना सांगितल्या. तसेच कॅबिनेटची बैठक असल्यानं ते लगेच निघून गेले, असं नाना पटोले म्हणाले. बैठकीमध्ये कामगार मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांसोबत काँग्रेसचे बडे नेते या बैठकीला उपस्थित होते, असंही नाना पटोलेंनी सांगितलं.
बैठकीमध्ये येत्या महापालिका निवडणुकांचा आढावा घेण्यात आला. तसेच येत्या काही दिवसांत वर्कींग प्रेसिडेंट आणि सर्व मंत्र्यांना बोलावण्यात येणार आहे, असंही नानांनी सांगितलं. दरम्यान, नितीन राऊत खरंच नाराज आहेत का? असं विचारलं असता पटोले म्हणाले, ''नाराजी हा राजकारणाचा भाग आहे. त्यामुळे आम्ही फारसा विचार करत नाही. मंत्र्यांच्या खात्यात अडचणी असतील तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावी. त्याचा अर्थ पक्षामध्ये काहीतरी गडबड आहे, असं नाही.''
Web Title: Nitin Raut Not Expected In Congress Meeting Says Nana Patole
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..