राज्यात गेल्या ५ दिवसात लोडशेडींग नाही; ऊर्जामंत्र्यांची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Raut on load shedding There is no load shedding in the last five days in the state

राज्यात गेल्या ५ दिवसात लोडशेडींग नाही; ऊर्जामंत्र्यांची माहिती

सध्या महाराष्ट्रात कोळसा तुटवडा असल्याने नागरिकांना भर उन्हाळ्यात लोडशेडींगचा सामाना करवा लागू शकतो. या दरम्यान राज्यात सध्या कोळशाची टंचाई असताना मागील पाच दिवसात लोडशेडींग होऊ दिलं नाही, जेव्हा की देशातील इतर एकूण बारा राज्यात विजेची टंचाई आहे, पण आपण राज्यात टंचाई होऊ दिली नाहीत, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.

उर्जामंत्री म्हणाले की, ऊर्जाविभागासंबंधी बाबी मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या आहेत. कोळशाची टंचाई असताना गेल्या पाच दिवसात कुठलंही लोडशेडींग राज्यात झालं नाही. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात लोडशेडींग आहे. हरियाणा आणि पंजाबमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कट लावलेली आहे. पण, महाराष्ट्रात आम्ही विजेचा तुटवडा भासू दिला नाही. आमची आर्थिक बाजू मुख्यमंत्र्यांना समाजवून सांगितली आहे. या सर्व गोष्टी त्यांना पटल्या आहेत. राज्य सरकारमध्ये ज्या सबसिडी दिल्या जातात त्याचा निधी केंद्राकडून देणं अपेक्षित आहे.

हेही वाचा: ''..तर मी नाही म्हणणार नाही"; संघटनांवर बंदीबाबत शरद पवारांचे विधान

कोळसा तुडवड्याबाबत केंद्र सरकारने राज्यावर आरोप लावले आहेत ते त्यांच्यावरच उलटले असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले. त्यांनी सांगितलं की, कोस्टल एरीयातले थर्मल पावर प्लॅंट इंपोर्ट केलेल्या कोळशावर चालायचे ते आता देशी कोळशावर चालतात, त्यांना सुध्दा कोळसा द्यावा लागतो. तसेच कोळशाच्या उत्पादन आणि रेल्वे रॅक यांच्या नियोजनात तफावत आहे. केंद्रातील उर्जा आणि कोळसा मंत्रलयाच्या नियोजनासाठी आमच्या बैठका होतात त्यासाठी आमचा पुढाकार आहे. एप्रिलमध्ये कोळसा मिळाल्याचे केद्राने सांगितले होते, यावर जवळपास १ लाख ३८ लाख टन कोळसा देणे देय आहे, असे राऊत म्हणाले.

हेही वाचा: नारायण राणेंच्या बंगल्यावर हातोडा पडणार?; BMC कडून १५ दिवसांची मुदत

Web Title: Nitin Raut On Load Shedding There Is No Load Shedding In The Last Five Days In The State

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :nitin raut