सोलापूर जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूने एकही पक्षी नाही बाधित! नागरिकांनी अंडी उकडून तर चिकन शिजवून खाण्याचा सल्ला

राज्यातील लातूर, रायगड व ठाणे या तीन जिल्ह्यांत पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून जिल्ह्यातील एकाही पक्ष्याला बर्ड फ्ल्यूची बाधा झालेली नाही. मात्र, दक्षता म्हणून नागरिकांनी अंडी चांगल्या प्रकारे उकडून व चिकन शिजवून खावे.
bird flu
bird flusakal
Updated on

सोलापूर : राज्यातील लातूर, रायगड व ठाणे या तीन जिल्ह्यांत पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून जिल्ह्यातील एकाही पक्ष्याला बर्ड फ्ल्यूची बाधा झालेली नाही. मात्र, दक्षता म्हणून नागरिकांनी अंडी चांगल्या प्रकारे उकडून व चिकन शिजवून खावे. पक्षी पालकांनी (पोल्ट्री फार्म) पशुसंवर्धन विभागाच्या सूचनांचे पालन करावे, अशा सूचना राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रदीपकुमार देवरे यांनी दिल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे यांनी दिली.

बर्ड फ्ल्यूबाबत कोणीही अफवा पसरवू नये. पक्षी पालकांनी दक्षता घ्यावी. कोंबड्यांमध्ये या रोगाची लक्षणे आढळल्यास तत्काळ पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. नरळे यांनी केले आहे. रायगड जिल्ह्यातील चिरनेर (ता. उरण), ठाणे जिल्ह्यातील कोपरी (ता. ठाणे ) येथे कुक्कुट पक्ष्यांत तर उदगीर (जि. लातूर) येथे कावळे दगावले. ते बर्ड फ्ल्यूने दगावल्याचे निदान भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थाने केले आहे. या आजाराचा राज्यातील अन्य जिल्ह्यात फैलाव होण्याची आणि बाजारातील अंडी व चिकन विक्रीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन याबाबत जनजागृतीच्या सूचना पशुसंवर्धन आयुक्त डॉ. देवरे यांनी दिल्या आहेत. तसेच याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना पशुसंवर्धन कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शक सूचना

  • पक्षी पालकांनी सर्वव्यापी जैव सुरक्षा कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी

  • क्षेत्रीय स्तरावर अधिकाऱ्यांनी कृती आराखड्याच्या कार्यवाहीची खात्री करावी

  • स्थलांतरित, वन्य पक्षी, कावळे दगावल्यास फार्मवर शवविच्छेदन करू नये

  • विभाग, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय प्रयोग शाळेस त्वरित सूचना द्याव्यात

  • संशयित, प्रादुर्भाव झालेल्या फार्मवरील पक्ष्यांची वाहतूक, खरेदी- विक्री थांबवावी

लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकीय केंद्राशी करावा संपर्क

जिल्ह्यात कोणत्याही पक्ष्याला बर्ड फ्ल्यूची बाधा झालेली नाही. तरीही दक्षता म्हणून कर्मचाऱ्यांना आठवडी बाजारात सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पक्षी पालक, शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी. पक्ष्यांत बर्ड फ्ल्यूची लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा.

- डॉ. नवनाथ नरळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

------------------------------------------------------------------------

सर्वेक्षण अन्‌ उपाययोजना केल्या जात आहेत

बर्ड फ्ल्यू हा मुख्यत्वे पक्ष्यांमध्ये आढळणारा आजार असून तो मनुष्यात आढळणे ही दुर्मिळ बाब आहे. तरीही सर्वेक्षण व इतर उपाययोजना केल्या जात आहेत. पोल्ट्री फार्म, कत्तलखान्यातील कर्मचारी, पशुपालन क्षेत्रातील नागरिक या जोखमीच्या गटातील एन्फ्ल्यूएंझा सदृश रुग्णांचे सर्वेक्षण अधिक सतर्कने करण्याच्या आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्या सूचना आहेत. त्यानुसार अंमलबजावणी सुरू आहे.

- डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com