Breaking : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; परीक्षांबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्या मार्गदर्शक सूचना!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

सीबीएसई कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नियमित वेळापत्रकानुसार होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या.

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) जुलै महिन्यात इयत्ता १०वी आणि १२वीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता, मात्र पालकांची नाराजी ओढावल्याने यातून बहुतांश शाळांना गृहमंत्रालयाने सूट दिली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये केंद्र देता येणार नसल्याचेही गृहमंत्रालायने स्पष्ट केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सीबीएसई कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नियमित वेळापत्रकानुसार होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक सोमवारी (ता.18) जाहीर करण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रकाप्रमाणे 1 ते 15 जुलै दरम्यान दहावी-बारावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा होणार आहेत. परंतु केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि सीबीएसईच्या या निर्णयावर पालक वर्गातून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.

- मोठी बातमी : 'या' भागातील शाळा सुरु होणार? ऑनलाइन अॅडमिशनला सुरुवात!

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांना लॉकडाऊन उपाययोजनांमधून सूट देण्याचा निर्णय घेतला असल्याचे ट्विट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.

- विद्यार्थ्यांनो, परीक्षा रद्द केल्यास 'कोरोना बॅच'चा शिक्का मारला जाणार

लॉकडाऊन उपाययोजनांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा उघडण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्य शिक्षण मंडळे, सीबीएसई, आयसीएसई यादी बोर्डाच्या इयत्ता १०वी आणि १२ वी साठी घेण्यात येणाऱ्या वार्षिक बोर्ड परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य सरकार आणि सीबीएसईकडून बोर्ड परीक्षा आयोजित करण्यासाठी निवेदन प्राप्त झाले होते.

त्या अनुषंगाने केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना परीक्षांचे आयोजन करण्याच्या अटींची तपशीलवार माहिती दिली आहे.

- आता महिलाही मशिदीत नमाज अदा करणार? सुप्रीम कोर्टाने केंद्रासह वक्फबोर्डाला पाठवली नोटीस

त्या अटी पुढीलप्रमाणे :

- कंटेनमेंट झोनमध्ये कोणत्याही परीक्षा केंद्राला परवानगी दिली जाणार नाही.

- शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी चेहऱ्यावर मास्क लावणे अनिवार्य असेल.

- सर्व परीक्षा केंद्रांमध्ये थर्मल स्क्रीनिंग आणि सॅनिटायझर तसेच सुरक्षित अंतराची तरतूद असावी.

- वेगवेगळ्या मंडळांकडून घेण्यात येणार्या परीक्षा पाहता त्यांचे परीक्षेचे वेळापत्रक सुनियोजित असले पाहिजे.

- विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर नेण्यासाठी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांकडून विशेष बसेसची व्यवस्था केली जाऊ शकते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No CBSE and State Board Exam centre in Containment Zone MHA issues guidelines for exams during lockdown