भक्तांच्या महापुराला मुकली चंद्रभागा

शंकर टेमघरे/विलास काटे
Wednesday, 1 July 2020

मुख्यमंत्री स्वत:च चालक 
‘महाराष्ट्राला कोरोनापासून संकटमुक्त कर,’ असे साकडे विठ्ठलाला घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंढरपूरला रवाना झाले. त्यांनी स्वत:च पंढरपूरपर्यंत गाडी चालवली. पर्यावरणमंत्री आणि चिरंजीव आदित्य ठाकरे तसेच पत्नी रश्‍मी ठाकरे असे तिघेच या गाडीत होते.

पंढरपूर - ‘पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी’ अशी महती असलेल्या पंढरीचे रूप आज पालटले होते. राज्यातील सकल संतांच्या पादुका पंढरीत वारीसाठी आल्या; पण त्यांच्यासमवेत दरवर्षी असलेला वैष्णवांचा मेळा नसल्यामुळे चंद्रभागेला जणू भक्तीची ओहोटी आल्यासारखे वाटत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आषाढी वारीसाठी प्रमुख नऊ संतांच्या पादुका मोजक्‍या वारकऱ्यांसमवेत मंगळवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास पंढरपूर शहरात दाखल झाल्या. त्यानंतर भादुले चौकापासून नाथ चौकातील माऊलींच्या मंदिरात पादुका चालत नेल्या. कोरोनाच्या संसर्गामुळे राज्य सरकारने पायी वारी रद्द करण्याचा निर्णय घेतला, तसेच संतांच्या पादुका थेट पंढरीला नेण्याची जबाबदारी घेतली. त्यानुसार पादुकांच्या प्रवासासाठी एसटी बस दिल्या. त्यात प्रत्येकी वीस वारकऱ्यांना परवानगी दिली. सर्व संतांच्या पादुकांनी परंपरेनुसार आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवले. पण, नंतर त्या तेथेच थांबल्या. मंगळवारी सकाळपासून संतांच्या पादुका त्यांच्या ठिकाणावरून एसटीने वाखरी येथे आणण्यात आल्या. तेथेही सोबत आलेल्यांची आरोग्य तपासणी झाली. वाखरीच्या तळाला छावणीचे स्वरूप आले होते. सरकारच्या वतीने सर्व नियोजन करण्यात आले होते. दरवर्षी वाखरीत सर्व संतांचा मेळा भरतो. यंदा राज्यातील नऊ संतांच्या पादुकांनाच वारीसाठी परवानगी दिली आहे.

पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयाची १२० वर्षांची वाटचाल

बसच्या मार्गात दर्शनासाठी दुतर्फा भाविक
सर्वांत लांबचा प्रवास असलेल्या संत मुक्ताईंच्या पादुका पहाटे चार वाजता मुक्ताईनगरमधून मार्गस्थ झाल्या होत्या. आळंदीतून माउली, तर देहूतून तुकोबारायांच्या पादुका दुपारी एक वाजता निघाल्या. सर्वच मार्गांवर भाविक संतांच्या दर्शनासाठी दुतर्फा उभे होते. या सर्व बस फुलांनी सजविल्या होत्या. सोबत कडेकोट पोलिस बंदोबस्त होता.

ज्येष्ठांनो, अशी घ्या काळजी....

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांसमवेत बसमध्ये मालक राजाभाऊ आरफळकर, प्रमुख विश्वस्त विकास ढगे, सोहळा प्रमुख योगेश देसाई, बाळासाहेब चोपदार होते; तर संत तुकाराम महाराजांच्या पादुकांसमवेत देहू संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे होते. अन्य संतांच्या पादुकांसमवेत संबंधित संस्थानचे पदाधिकारी तसेच मोजके वारकरी होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No devotees on Edge of Chandrabhaga river due to coronavirus