

Maharashtra AQI Today: Air Quality Deteriorates in Major Cities Amid Rising Pollution
esakal
Maharashtra AQI Today: उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये वायुप्रदूषणाची पातळी वाढत असताना महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ताही चिंतेचा विषय ठरत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, शनिवारी सकाळी नागपूरमध्ये सर्वाधिक 205 AQI नोंदवण्यात आला. त्यामुळे नागपूरमधील हवेची गुणवत्ता 'खराब' (Poor) श्रेणीत पोहोचली आहे. दुसरीकडे, मुंबईसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये हवा 'मध्यम' (Moderate) श्रेणीत नोंदवण्यात आली आहे.