Video : ताडी नव्हे; हे तर घातक रसायन!

सोमनाथ भिले, डोर्लेवाडी
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

ताडीनिर्मितीसाठी वापरले जाणारे घातक पदार्थ

  • क्‍लोरेल हाइड्रेड हे विषारी रसायन
  • पोट न फुगण्यासाठी सोडा
  • चव येण्यासाठी गोड व आंबट पदार्थ
  • नैसर्गिक रंग येण्यासाठी मडी पावडर

राज्यात ताडीच्या निर्मितीसाठी उपलब्ध असलेल्या शिंधाडाच्या झाडांच्या तुलनेने कितीतरी मोठ्या प्रमाणात ताडीची विक्री होत आहे. कारण, ताडीनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात रसायनांचा वापर केला जात आहे. अशा रसायनयुक्त ताडीमुळे अनेकांनी आपला जीवही गमावला आहे. त्यामुळे ताडीविक्रीचे परवाने देण्यापूर्वी सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अशी तयार होते रसायनयुक्त ताडी
राज्यात मोठ्या प्रमाणात ताडीची दुकाने आहेत. ताडीविक्री करणारे आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यातील रहिवासी आहेत. ते महाराष्ट्रात येऊन ताडीविक्रीचा व्यवसाय करतात. ज्या ठिकाणी नैसर्गिकरीत्या ताडी तयार होणारी झाडे आहेत, त्या ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाकडून दुकानांना परवानगी देण्यात येते. मात्र, सध्या नैसर्गिक शिंधाडाच्या झाडाची ताडी न बनवता अधिक नशा यावी व जास्त प्रमाणात ताडी तयार व्हावी, या हेतूने हे विक्रेते क्‍लोरेल हाइड्रेड हे विषारी रसायन व पोट फुगू नये, यासाठी सोड्याचा वापर करतात. चव येण्यासाठी गोड व आंबट पदार्थ वापरतात. तसेच, ताडीला नैसर्गिक रंग यावा, यासाठी मडी पावडरचा वापर करतात. अशा पद्धतीतून केवळ एक हजार रुपये खर्चात २० हजार रुपयांची ताडी तयार होते. परंतु, त्यामुळे विषारी ताडी तयार होते. अशा ताडीमुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे.

अमली पदार्थाच्या कारखान्यावर छापा

अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष
पुणे शहरात ५० हून अधिक ताडीची अधिकृत दुकाने आहेत. एका दुकानाची किंमत वर्षाला ५० ते ६० लाख रुपये होते. दुकाने लिलावात घेण्यासाठी चढाओढ पाहावयास मिळते. एका झाडापासून दोन दिवसांत फक्त ५ लिटर नैसर्गिक ताडी तयार होते. शिवाय, तेवढ्या प्रमाणात झाडेच उपलब्ध नाहीत. मग एवढ्या दुकानांना लागणारी ताडी तयार कशी होते व लाखो रुपयांचा महसूल द्यायला या दुकानदारांना कसे परवडते, हा खरा प्रश्‍न आहे. राज्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना हा सगळा प्रकार माहीत आहे. परंतु, हे या विषयाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करतात, अशी नागरिकांची तक्रार आहे.

चिकनमुळे कोरोना होत असल्याची माहिती पसरविल्याने पोल्ट्री व्यावसायिकांचे झाले इतके कोटींचे नुकसान

दारूपेक्षा स्वस्त दरात व जास्त प्रमाणात ताडी मिळते. त्यामुळे त्याचे सेवन करणाऱ्यांमध्ये गरीब व मजुरांचे प्रमाण जास्त आहे. मात्र, त्याच्या जास्त आहारी गेल्यानंतर त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. यात अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. ताडीविक्रीच्या दुकानांच्या परवान्याची मुदत फेबुवारीअखेर संपत आहे. सरकारने जनतेच्या हितासाठी या परवान्यांचे नूतनीकरण व नवीन परवानगी देऊ नये.
 - संतोष नेवसे, सामाजिक कार्यकर्ते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not tadi but dangerous chemicals