आता थेट सरपंच निवडीचा निर्णय होणार २९ मार्चला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

थेट जनतेतूनच व्हावी सरपंच निवड
पारनेर - ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवडीच्या निर्णयामुळे भविष्यात लोकशाहीला धोका निर्माण होऊन राज्यात हुकूमशाही येईल, अशी भीती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. राज्यात पूर्वीप्रमाणेच जनतेतून सरपंच निवड होणे गरजेचे आहे. सरकारने आधीच्या सरकारविरुद्ध जे करायचे ते करावे. मात्र, जनतेच्या हिताला बाधा येत असेल तर ते सहन करणार नाही, असा इशाराच अण्णा हजारे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

मुंबई - महाविकास आघाडी सरकारने थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द केलेला असताना त्याचे कायद्‌यात रूपांतर झाले नसल्याचा फटका सरकारला बसला आहे. आज राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 19 जिल्ह्यांतील सुमारे 1 हजार 570 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यामुळे, सध्याच्या अर्थसंकल्पि अधिवेशनात सरकारने कायदा केल्यानंतरही या निवडणूका पार पडतील की नाही याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा

या ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 29 मार्च रोजी मतदान; तर 30 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल 2020 ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होत आहेत. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे 6 ते 13 मार्च या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 16 मार्च रोजी होईल. 

‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०२०’ कोण ठरणार; आज होणार फैसला

नामनिर्देशनपत्रे 18 मार्च पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 29 मार्च रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतमोजणी 30 मार्च रोजी होईल.

मुंबई विमानतळावर आलेल्या ५० हजार प्रवाशांची तपासणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now the decision of direct sarpanch selection will be made on March 29