धनगर आरक्षण आंदोलनातील दाखल गुन्हा घेतला मागे

dhngar.jpg
dhngar.jpg

बारामती : धनगर आरक्षणाच्या आंदोलनात दाखल झालेला गुन्हा आज मागे घेण्यात आला. धनगर आरक्षण आंदोलनादरम्यान आंदोलकांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. किशोर मासाळ, विलास ॠषिकांत देवकाते, संदीप चोपडे अभिजीत देवकाते, माणिक काळे, चंद्रकांत वाघमोडे, आबा टकले, संपतराव टकले, संग्राम झारगड, उमेश देवकाते यांचेवर असलेला गुन्हा आज मागे घेण्यात आला. त्यांच्या वतीने अँड. अमोल सातकर व अँड. रणजित गावडे यांनी काम पाहिले. राज्य सरकारच्या निर्णयानंतर हा गुन्हा आज मागे घेण्यात आला. पाच वर्षानंतर हा गुन्हा सरकारने मागे घेतला. 

धनगर आरक्षण आंदोलनादरम्यान माजी मंत्री मधुकर पिचड यांनी आरक्षणाला विरोध केला होता. याचा रोष संपुर्ण महाराष्ट्रभर धनगर समाजात दिसला त्यामुळे त्यांची धनगर समाजाचे वतीने बारामती भिगवण चौक येथे अंत्ययात्रा काढत त्यांचा पुतळा दहन करण्यात आला होता, याच आरोपातून राज्य सरकार व बारामती न्यायालयात प्रलंबित असलेला गुन्हा आज मे खोत साहेब यांनी मागे घेतला.

यामध्ये किशोर मासाळ व इतर 10 जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. बारामतीच्या न्यायालयात पाच वर्षे हा खटला सुरु होता. दरम्यान या गुन्ह्यासोबतच धनगर समाजातील युवकांवर दाखल इतरही गुन्हे मागे घ्यावेत असे आवाहन राष्ट्रवादी प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com