

omraje nimbalkar
esakal
मुंबई: शिवसेना ठाकरे गटात अनपेक्षित आणि मोठी बंडखोरी झाली आहे. तब्बल ६ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून वेगळा गट स्थापन करण्याची मागणी केली आहे. या बंडखोरीमागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीचा हात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शिंदे यांनी ठाकरे गटात उभी फूट पाडली असून, पक्षात मोठा भूकंप घडवला आहे.