Eknath Shinde: 'अमित शाहांनी एकदा निश्चय केला की, ते थांबत नाहीत', एकनाथ शिंदेंकडून शहांवर कौतुकाचा वर्षाव

शाहांचं सहकार क्षेत्रात मोठं योगदान असल्याचं यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले आहेत
Eknath Shinde
Eknath Shindeesakal

सहकार विभागाच्या ‘डिजिटल पोर्टल’ च्या शुभारंग सोहळ्याला सुरूवात झाली आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत, केंद्रीय सहकार राज्यमंत्री एल.वर्मा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महाराष्ट्राचे सहकार दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी नेते उपस्थित आहेत.

या कार्यक्रमावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 'शाहांचं सहकार क्षेत्रात मोठं योगदान आहे. नवं पोर्टल सहकार क्षेत्रातील नवा आयाम असणार आहे, सहकार क्षेत्रात कार्यकारी निर्णय घेतला आहे. अमित शाहांनी एकदा निश्चय केला की, ते थांबत नाहीत. मोदी आणि शाहांमुळे देशात मोठे बदल होत आहेत. कारखान्यांचा 10 हजार कोटींचा कर माफ करण्याचा शाहांनी निर्णय घेतला असून त्यांचं नेतृत्त्व सहकार विभागासाठी वरदान असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
Amit Shah Pune Visit: अमित शहांच्या दौऱ्यात ऐनवेळी मोठा बदल! कार्यक्रमानंतर सर्व बैठका रद्द; तातडीने गाठणार दिल्ली

'अजित पवार म्हणाले आजपर्यंत केंद्रात सहकार विभाग सुरू करण्याची हिंमत अमित शाहांनी दाखवली. बरोबर ना अजित दादा, हे बोलण्याचं अन मान्य करण्याचं ही धाडस लागतं. हे कार्य पाहूनच अजितदादांनी आमच्या सोबत येण्याचा निर्णय घेतल्याचंही यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले आहेत'.

शाहांनी सहकार क्षेत्रात क्रांतिकारक निर्णय घेतले आहेत. केंद्रीय सहकार खात्याचं काम उत्तम सुरू आहे. शाह सतत देशहिताचा विचार करतात. ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. शाहांमुळे सहकार क्षेत्राचा गैरवापर थांबला असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Eknath Shinde
Bacchu Kadu: '...यापुढे सरकारनं आणखी चार जणांना दुखवू नये', बच्चू कडूंचा महायुती सरकार सल्ला

अमित शाह यांच्यामुळे सहकार क्षेत्रात पारदर्शकता आली आहे. अमित शाह यांच्यामुळे सहकार क्षेत्राला संजीवनी मिळाली आहे. शाहांना सहकार क्षेत्राचा मोठा अनुभव असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com