महिलांना 33 टक्के आरक्षण पण...नव्या सभागृहात फक्त एवढ्याच महिला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 October 2019

विधानसभेत 24 पैकी सध्या सर्वाधिक भाजपच्या 12 महिला आमदार आहेत. तर सर्वात कमी शिवसेना या पक्षाच्या केवळ 2 महिला आमदार आहेत.

मुंबई : खरंतर महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण आहे. 288 जागांच्या महाराष्ट्र विधानसभेत 33 टक्के आरक्षणाचा विचार केल्यास किमान 95 महिला आमदार असणं अपेक्षित आहे. 2014 च्या निवडणुकीत फक्त 20 महिला आमदार निवडून होत्या. त्यामुळे 2014च्या तुलनेत यंदा त्यात चार महिला आमदारांची भर पडली असून हा आकडा 24 वर पोहोचला आहे. विधानसभेच्या आजवरच्या इतिहासात हा सर्वाधिक आकडा आहे. राज्याच्या नव्या विधानसभेत 288 सदस्यांमध्ये अवघ्या 24 महिला असून, त्यातील 12 विद्यमान आमदार आहेत.

विधानसभेत 24 पैकी सध्या सर्वाधिक भाजपच्या 12 महिला आमदार आहेत. तर सर्वात कमी शिवसेना या पक्षाच्या केवळ 2 महिला आमदार आहेत.

भाजपच्या महिला आमदार
1. मंदा म्हात्रे - बेलापूर
2. मनिषा चौधरी - दहिसर
3. विद्या ठाकूर - गोरेगाव
4. भारती लव्हेकर - वर्सोवा
5. माधुरी मिसाळ - पर्वती
6. मुक्ता टिळक - कसबापेठ
7. देवयानी फरांदे - नाशिक मध्य
8. सीमा हिरे - नाशिक पश्चिम
9. श्वेता महाले - चिखली
10. मेघना बोर्डीकर - जिंतूर
11. नमिता मुंदडा - केज
12. मोनिका राजळे - शेवगाव

काँग्रेसच्या महिला आमदार
1. वर्षा गायकवाड - धारावी
2. प्रणिती शिंदे - सोलापूर मध्य
3. प्रतिभा धानोरकर - वरोरा
4. सुलभा खोडके - अमरावती
5. यशोमती ठाकूर - तिवसा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदार
1. सरोज अहिरे - देवळाली
2. सुमनताई पाटील - तासगाव-कवठेमहंकाळ
3. अदिती तटकरे - श्रीवर्धन

शिवसेनेच्या महिला आमदार
1. यामिनी जाधव - भायखळा
2. लता सोनवणे - चोपडा

अपक्ष महिला आमदार
1. गीता जैन, भाजप बंडखोर - मीरा-भाईंदर
2. मंजुळा गावित - साक्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only 24 women candidate elected in maharashtra Vidhansabha 2019