'दर महिन्याला निवडणूक लावा म्हणजे...'; सुप्रिया सुळेंची केंद्रावर खोचक टीका | Inflation | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Supriya Sule

'दर महिन्याला निवडणूक लावा म्हणजे...'; सुप्रिया सुळेंची केंद्रावर खोचक टीका

नवी दिल्ली : इंधनाच्या वाढलेल्या (Fuel Price) किमतींवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची खिल्ली उडवली आहे. 'इंधन दरवाढ रोखण्यासाठी केवळ निवडणुकाच सक्षम आहेत असे सुळे यांनी म्हणत केंद्र सरकारवर खोचक टीका केली आहे. जेव्हा निवडणूका असतात तेव्हा सरकार गॅस, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करीत नाही. त्यामुळे आमचं तर म्हणणं आहे की, आपण दर महिन्याला निवडणूक (Election) लावा म्हणजे सरकार तिकडे व्यस्त राहील परिणामी गॅस, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत, अशी खोचक टिपण्णी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. महागाईचा कहर असतानाच ही दरवाढ लादण्यात आल्याचं त्या म्हणाल्या. (Suprya Sule On Fuel Price Hike)

पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या (LPG Price) दरवाढीबाबत राजद नेते मनोज झा म्हणाले की, 'पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रणात नसल्याचा दावा सरकार करते, मग निवडणुका सुरू असताना त्यावर नियंत्रण कसे होते असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत खोटं बोलण्याची मर्यादा असते असे ते म्हणाले. तर, नुकत्याच झालेल्या इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी मंगळवारी लोकसभेतून सभात्याग केला. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत इंधनाचे वाढलेले दर मागे घेण्याची मागणी करत सभागृहावर बहिष्कार टाकला होता.

हेही वाचा: देशात हिजाबवरुन तांडव; अमेरिकेत पायलटला मिळाली ऑन ड्युटी 'हिंदुत्व' जपण्याची मुभा

विशेष म्हणजे मंगळवारच्या दरवाढीनंतर बुधवारीदेखील (दि.23) पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. याआधी 4 नोव्हेंबर रोजी याच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी (दि. 22) तब्बल 137 दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

Web Title: Only Elections Can Stop Fuel Price Hike Says Supriya Sule On Inflation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top