'कोणी कितीही रणनीती आखली, तरी २०२४ मध्ये मोदी सरकारच येणार'

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस Media Gallery

नागपूर : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओकवर (prashant kishor and sharad pawar meeting) भेट घेतली. राजकारणातील दोन्ही चाणक्यांनी ही भेट म्हणजे देशात कशाची तरी सुरुवात आहे, अशा चर्चाही रंगल्या होत्या. त्यावरच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (opposition leader devendra fadnavis commented on prashant kishor and sharad pawar meeting)

देवेंद्र फडणवीस
रेकॉर्ड ब्रेक लसीकरण, नागपुरातील तब्बल १३ गावांनी करून दाखविले

कोणी कोणाला भेटावं यासंदर्भात प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मात्र, कोणी कितीही रणनीती आखली, तरी 2024 च्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल यात शंका नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, प्रशांत किशोर आणि शरद पवारांच्या भेटीनंतर देशात अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ही २०२४ च्या निवडणुकीची रणनिती तर नाही ना? अशाही चर्चा रंगल्या आहेत. अनेकांनी आपआपल्यापरीने या भेटीचे अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, या भेटीमध्ये नेमके काय घडले? हे अद्यापही कोणीही जाहीर केले नाही.

देवेंद्र फडणवीस यांनी नक्षल्यांबाबतही वक्तव्य केले. नक्षल विचार हा मुळातच विविध समाजामध्ये तेढ निर्माण करणार आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या पत्रकाची सखोल चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

कमी उपस्थित निघणाऱ्या पायी वारीसंदर्भात वारकऱ्यांना परवानगी द्यायला हवी होती. मुळातच त्यांनी पन्नास लोकांच्या उपस्थितीत वारीची परवानगी मागितली होती. शिवाय मार्गात येणाऱ्या गावांचे ठरावही घेतले होते. त्यामुळे सरकारने परवानगी द्यायला हवी होती, असेही फडणवीस म्हणाले.

मराठा आरक्षणासंदर्भातील या आंदोलनात भाजपचे नेते सहभागी होते. यापूर्वीही आमचं सरकार असताना ज्या ठिकाणी मराठा मोर्चे निघायचे तिथले आमदार त्या मोर्चामध्ये सहभागी होत होते. समाजाच्या मागणीला लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असणं स्वाभाविक आहे, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com