MPSC
MPSCe sakal

‘MPSC’च्या हजारो विद्यार्थ्यांची व्यथा! 3 परीक्षांचे वेळापत्रक तर 3 परीक्षांचे निकाल प्रलंबित; ‘PSI’ची शारीरिक चाचणीही लांबणीवर; वयोमर्यादा संपण्याला जबाबदार कोण?

लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा- २०२३ चा निकाल, कर सहायक व लिपिक टंकलेखक- २०२३ कौशल्य चाचणीचे वेळापत्रक आणि पीएसआय मुख्य परीक्षा- २०२३ चा निकाल पुढील काही दिवसांत म्हणजेच लवकर प्रसिद्ध होईल असे आयोगातील विश्वसनिय सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक परिपत्रक जाहीर करून समाज कल्याण विभाग परीक्षा- २०२३ व राज्यसेवा पूर्व परीक्षा- २०२४ पुढे ढकलल्या आहेत. मुळातच पुढील तारखा न देता फक्त पेपर पुढे ढकलण्याची कार्यपद्धती चुकीची असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. वर्षानुवर्षे काही गुणांनी स्वत:सह आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करू न शकलेला मुलगा वय संपल्याने रिकाम्या हाती परत जावू नये, हा त्यामागील हेतू आहे.

उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोठी आशा घेऊन अनेक तरूण पुण्या-मुंबईत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु करतात. पोटाला चिमटा घेऊन एकवेळचे जेवण कमी करून ते स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी खर्चाची भागवाभागवी करतात. आई- वडिलही आपला मुलगा साहेब होईल या आशेने मिळेल ते काम करून त्याला जमेल तसे खर्चासाठी पैसे पाठवतात. पण, या ठिकाणी तयारी करूनही वेळेवर परीक्षा होत नसतील आणि तोंडावर आलेल्या परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलल्या जात असतील तर कसे व्हायचे अशी चिंता विद्यार्थ्यांना सतावू लागली आहे. त्यातच कोरोना काळापासून बोटावर मोजण्या एवढ्याच परीक्षा झाल्या आहेत. अनेकांची वयोमर्यादा त्यात संपुष्टात आली. आता तरी किमान वेळेच्या वेळेला पूर्वीप्रमाणे परीक्षा व्हाव्यात अशी त्या युवकांना आशा आहे. कुटुंबापासून दूर राहणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या व्यथा कोणाला तरी समजतील, अशी सर्वांनाच अपेक्षा आहे.

परीक्षा पुढे ढकलण्यास नेमके कारण काय?

केंद्रीय लोकसेवा आयोग एखादी परीक्षा पुढे ढकलताना नवीन तारीख जाहीर करते. मग, राज्य लोकसेवा आयोगाला त्यासंदर्भात नेमकी अडचण काय असा विद्यार्थ्यांचा सवाल आहे. दरम्यान, राज्य शासनाने तातडीने बिंदुनामावली निश्चित करून आयोगाला द्यावी एवढीच विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. तारीख जाहीर झाल्यानंतर त्या काळात विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करणे सोयीचे होते. पण, आता परीक्षा पुढे ढकलल्या कशामुळे व नवीन तारखा जाहीर होण्यास नेमकी अडचण कशाची आहे, यावर कोणीतरी स्पष्टीकरण देणे जरूरी आहे. जेणेकरून त्या विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम तरी दूर होईल. उमेदवारांचे आयुष्य, वाढते वय, आर्थिक नियोजन, मुलींना शिक्षणासाठी मिळणाऱ्या अपुऱ्या संधी या बाबींचा आयोगाने व राज्य शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशीच सर्वांची आशा आहे.

वैतागलेले स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थी म्हणतात...

  • महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२४ कधी होणार?

  • महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२४ जाहिरात व तारीख कधी प्रसिद्ध होईल?

  • समाजकल्याण विभाग-२०२३ परीक्षा कधी होणार आहे?

  • पीएसआय- २०२२ शारीरिक चाचणी कधी होणार?

  • लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा- २०२३ निकाल कधी लागणार?

  • कर सहायक व लिपिक टंकलेखक- २०२३ कौशल्य चाचणीचे वेळापत्रक कधी जाहीर होईल?

  • पीएसआय मुख्य परीक्षा- २०२३ चा निकाल कधीपर्यंत लागेल?

आयोगाच्या विश्वसनिय सूत्रांच्या माहितीनुसार...

  • महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख, महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात व परीक्षेची तारीख आणि समाजकल्याण विभागाच्या परीक्षेची तारीख ही मराठा समाजाच्या १० टक्के आरक्षणानुसार बिंदुनामावली निश्चित होऊन पदे फायनल झाल्यावर जाहीर होईल.

  • लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा- २०२३ चा निकाल, कर सहायक व लिपिक टंकलेखक- २०२३ कौशल्य चाचणीचे वेळापत्रक आणि पीएसआय मुख्य परीक्षा- २०२३ चा निकाल पुढील काही दिवसांत म्हणजेच लवकर प्रसिद्ध होईल.

  • पीएसआय- २०२२ शारीरिक चाचणी घेण्यासाठी पोलिस अधिकारी उपलब्ध नाहीत. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांचे मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर शारीरिक चाचणी तातडीने घेण्याचे आयोगाचे नियोजन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com