

Why Was the Palghar Accused Taken Into BJP CM Fadnavis Explains
Esakal
पालघरमध्ये साधू हत्याकांडातील प्रमुख आरोपी काशिनाथ चौधरी यांच्या प्रवेशाला स्थगिती देण्यात आलीय. भाजपकडून यावर स्पष्टीकरणही देण्यात आलं आहे. रोहित पवार यांनी काशिनाथ चौधरी यांच्या प्रवेशावरून भाजपवर जोरदार टीका केली होती. भाजपने मुख्य आरोपी म्हणून ज्याच्यावर आरोप केले त्याला पक्षात घेतलं. त्यामुळे पालघर हत्याकांडामागे भाजपच होतं का असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला होता. वॉशिंगमशिनमध्ये घालून काशिनाथ चौधरींना पक्षात घेतलंय असंही रोहित पवार म्हणाले होते.