
Pankaja Munde : पंकजा मुंडे पक्ष काढणार की पक्षप्रवेश करणार? राजकारणातील ऑफरवरुन चर्चांना उधाण
Pankaja Munde : भाजपमध्ये अंतर्गत खळबळ माजली आहे. पंकजा मुंडे यांच्यावर भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा नेहमी असते. आज पंकजा मुंडे यांनी राज्यात माझे नेते नाहीत माझे नेते दिल्लीत आहेत, असे बोलून नवा वाद निर्माण केला आहेत. तसेच नाराजीबाबत वरिष्ठांशी बोलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी मी भाजपची आहे मात्र भाजप माझा नाही, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी वेगवेगळ्या पक्षांकडून ऑफर येत आहेत.
दरम्यान काँग्रस नेते बाळासाहेब थोरात यांनी मोठ वक्तव्य केल आहे. काँग्रेसचा दरवाजा पंकजा मुंडे यांच्यासाठी खुला आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. पंकजा मुंडे आणि त्यांच्या बहिणीवर अन्याय होत आहे, त्या भावनेतून पंकजा मुंडे बोलल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील पंकजा मुंडे यांना ऑफर दिली आहे. पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांच स्वागत करु, पण आधी त्यांच्या पक्षातील वाद बघावे लागतील. मात्र भाजप यावर योग्य तोडगा काढेल, असे संजय शिरसाट म्हणाले.
काँग्रेसने पंकजा मुंडे यांना दिलेल्या ऑफरवर सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार केला आहे. पंकजांसाठी काँग्रेसने दरवाजा खुला केला मात्र त्यातून काँग्रेसचे अनेक नेते बाहेर येतील. पंकजा मुंडे यांची वैचारीक भूमिका वेगळी आहे. त्या काँग्रेसमध्ये कशा जाऊ शकतात?.
पक्ष काढणार का?
स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज बीडच्या परळीत गोपीनाथ गड येथे सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी पंकजा मुंडे यांनी भाजपमध्ये राहणार की नाही, याबद्दल थेटपणे भाष्य केलं.
पंकजा मुंडे यांचं भाषण सुरु असताना एक कार्यकर्ता उठला आणि पक्ष स्थापन करा, अशी मागणी करु लागला. यानंतर पंकजा मुंडे यांनी निर्णय घेण्यासाठी मला आडपडद्याची गरज नसल्याचं सांगून मी माझ्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे.